Curd : उन्हाळ्यात दह्याचा आहारामध्ये समावेश करा आणि केस, त्वचा, आरोग्य चांगले मिळवा!

उन्हाळ्यात (Summer) आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप जास्त महत्वाचे आहे. दह्यासारखे निरोगी पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दही (Curd) खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. हे आपल्या आतड्यासाठी चांगले आहेत.

Curd : उन्हाळ्यात दह्याचा आहारामध्ये समावेश करा आणि केस, त्वचा, आरोग्य चांगले मिळवा!
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:07 PM

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप जास्त महत्वाचे आहे. दह्यासारखे निरोगी पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दही (Curd) खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. हे आपल्या आतड्यासाठी चांगले आहेत. तसेच दह्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. दही शरीराला थंडावा देण्याचे काम करते. दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचे (Calcium) प्रमाण जास्त असते. तुम्ही याचे नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळच्या जेवणात करू शकता. आरोग्यासोबतच केस आणि त्वचेसाठीही दही फायदेशीर आहे.

सनबर्न कमी होण्यास मदत

उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी दही हा एक चांगला उपाय आहे. हे सनबर्न शांत करते. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते. दह्यामध्ये झिंक, प्रोबायोटिक्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. सनबर्नमुळे प्रभावित झालेल्या त्वचेवर थंड दही लावता येते. 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील सनबर्नची समस्या दूर होण्यास मदत होईल.

हायड्रेट राहण्यास मदत

शरीराला हायड्रेट आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी हेल्दी ड्रिंक्सची गरज असते. उन्हाळ्यात तुम्ही दह्यापासून बनवलेले ताक पिऊ शकता. हे निर्जलीकरण आणि थकवा दूर करते, हे आरोग्यदायी पेय तुमचे शरीर थंड करते. ताक बद्धकोष्ठता दूर करते. वजन कमी करण्यास मदत होते. ते बनवण्यासाठी ब्लेंडरमध्ये दही, थंड पाणी, काळे मीठ, जिरेपूड, हिंग आणि कोथिंबीर टाका आणि मस्त थंडगार प्या.

त्वचेसाठी दही फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. दही तुमची त्वचा तरुण आणि निरोगी ठेवते. तुम्ही फेसपॅक म्हणून दही वापरू शकता, यासाठी बेसन, दही आणि चिमूटभर हळद एका भांड्यात मिसळा. 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक टॅन दूर करण्याचे काम करतो. दह्यामध्ये आपण गुलाब पाणी मिक्स करूनही त्वचेला लावू शकतो. यामुळे त्वचेवरील टॅन आणि कोळेपणा दूर होतो.

संबंधित बातम्या :

Lips : उन्हाळ्यात कोरड्या ओठ्यांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

उन्हाळ्यातील पुरळांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.