तुमच्या डोळ्याच्या खालीही डार्क सर्कल आहेत?, ‘हे’ घरगुती उपाय करा आणि डार्क सर्कल दूर पळवा!
झोप कमी झाल्याने, धावपळीमुळेही डार्क सर्कल येण्याचं प्रमाण वाढतं. डार्क सर्कल लपवण्याचा खूप प्रयत्न करूनही ते लपत नाहीत. त्यामुळे डार्क सर्कल घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे.
मुंबई : डार्क सर्कल (Dark Circles) प्रत्येक दुसऱ्या मुलीशी संबंधित समस्या आहे. डार्क सर्कलमुळे चेहरा डल दिसतो. डार्क सर्कलमुळे मुलींना अनेकदा न्यूनगंड येतो. पण हे डार्क सर्कल कशामुळे येतात, याची कारणं काय आहेत? डार्क सर्कल येण्यामागील कारणं म्हणजे तणाव (Stress). तुमच्या आयुष्यात खूप ताण-तणाव असेल तर डार्क सर्कल येतात. झोप कमी झाल्याने, धावपळीमुळेही डार्क सर्कल येण्याचं प्रमाण वाढतं. डार्क सर्कल लपवण्याचा खूप प्रयत्न करूनही ते लपत नाहीत. त्यामुळे डार्क सर्कल घालवण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून डार्क सर्कलपासून तुमची सुटका होऊ शकते. चला तर मग डार्क सर्कल येण्यामागची कारणं आणि उपाय जाणून घेऊयात…
डार्क सर्कल येण्याची कारणं
थकवा
तुमची झोप अपूर्ण झाली तर तुम्हाला थकवा येतो. झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या डोळ्यांखाली शरीरात अतिरिक्त द्रव जमा होतो. डोळ्यावर सूज येऊ लागते. त्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात.
वाढतं वय
डार्क सर्कल येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे वाढतं वय. जसजसं तुमचं वय वाढतं तसतशी तुमच्या डोळ्यांखालील त्वचा पातळ होत जाते. त्वचा आवश्यक चरबी आणि कोलेजन गमावते. त्वचेखालील रक्तवाहिन्या अधिक दिसू लागतात, त्यामुळे तुमच्या डोळ्यांखालील भाग गडद होतो.
लॅपटॉप-कॉम्प्युटरचा अती वापर
टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रिनकडे जास्त वेळ पाहिल्याने तुमच्या डोळ्याभोवती रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा काळी पडते.
डिहायड्रेशन
जेव्हा तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, तेव्हा तुमच्या डोळ्यांखालील त्वचा निस्तेज दिसू लागते.
ऊन
जास्त सूर्यप्रकाशामुळे तुमच्या डोळ्याभोवती रंगद्रव्य निर्माण होते. त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा काळी पडते.
डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय
कोल्ड कॉम्प्रेस लावा
कोल्ड कॉम्प्रेस लावल्याने सूज कमी होण्यास आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत होते. हे सूज कमी करते आणि डार्क सर्कल दूर करण्यास मदत करते. तुम्ही काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून डोळ्यांना लावू शकता.
शांत झोप घ्या
चांगली झोप घेतल्याने डार्क सर्कल कमी होण्यासही मदत होते. थकवा टाळण्यासाठी किमान 8 तासांची झोप घ्या. यामुळे डार्क सर्कल कमी होतात.
टी-बॅग्ज्
डोळ्यांवर थंड टी-बॅग लावल्याने डार्क सर्कल कमी होतात. चहामध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रक्ताभिसरण सुधारते आणि डार्क सर्कल जाण्यास मदत होते.
संबंधित बातम्या