Skin Care : त्वचेचा टोन सुधारण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!
वाढलेले धावपळीमुळे आपण त्वचेची विशेष काळजी ही घेऊ शकत नाहीत. ज्यामुळे आपल्या त्वचेचा टोन दिवसेंदिवस खराब होत जातो. त्यामुळे आपली त्वची निस्तेज आणि खराब होते.
मुंबई: वाढलेल्या धावपळीमुळे आपण त्वचेची विशेष काळजी ही घेऊ शकत नाहीत. ज्यामुळे आपल्या त्वचेचा टोन दिवसेंदिवस खराब होत जातो. त्यामुळे आपली त्वची निस्तेज आणि खराब होते. चेहऱ्याचा टोन सुधारण्यासाठी विविध साैंदर्य उत्पादने वापरली जातात. तरीही त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होत नाही. जर आपल्या त्वचेचा टोन सुधारायचा असेल तर आपण काही घरगुती उपाय केली पाहिजेत. (Definitely do these home remedies to improve skin tone)
त्वचेचा टोन सुधारण्यासाठी आपण चंदन पावडर, खोबरेल तेल, बदाम तेल, बेसन पीठ आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा खास फेसपॅक घरी तयार केला पाहिजे. ज्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत मिळते. यासाठी आपल्या एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि बदाम तेल, एक चमचा बेसन पीठ आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर याची बारीक पेस्ट तयार करा.
ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक लावल्याने आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. मध, हळद, नारळ पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपण एक चिमुठभर हळद, दोन चमचे मध आणि चार चमचे नारळ पाणी घ्या.
वरील हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याचा अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तिनदा लावला पाहिजे. अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Definitely do these home remedies to improve skin tone)