Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचा दिसण्यासाठी ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!

आजकाल मुली सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यासाठी महागडी साैंदर्य उत्पादने देखील वापरतात.

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचा दिसण्यासाठी 'हे' घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 4:30 PM

मुंबई : आजकाल मुली सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यासाठी महागडी साैंदर्य उत्पादने देखील वापरतात. मात्र, जशी सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे. तशी त्वचा मिळत नाही. आपण काही घरगुती उपाय करून देखील सुंदर त्वचा मिळू शकतो. विशेष म्हणजे घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला विशेष काही खर्च देखील लागत नाही. (Definitely try this face pack to get beautiful skin)

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला बदाम तेल, बेसन पीठ, हळद, गुलाब पाणी आणि दुधावरची साय लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावू शकता.

त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Definitely try this face pack to get beautiful skin)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.