Skin Care : गुडघे आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय करा !

आपण सर्वचजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण हाताच्या कोपऱ्यांकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे दुर्लक्ष करतो.

Skin Care : गुडघे आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाठी 'हे' 5 घरगुती उपाय करा !
गुडघे आणि कोपरावरील काळपटपणा
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:06 AM

मुंबई : आपण सर्वचजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण हाताच्या कोपऱ्यांकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे हे काळपट आणि जाड त्वचा होते. आपण जसे त्वचेकडे लक्ष देतो, तसेच आपण हाताच्या कोपऱ्याकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे देखील लक्ष दिले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. (Do these 5 home remedies to remove blackheads on the knees and elbows)

लिंबू – लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचेच्या टोनमध्ये सुधारण्यास मदत करतात. लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि हळू हळू मालिश करा आणि 10 मिनिटे तसेच सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा असे केल्याने काळपटपणा कमी होण्यास मदत होते.

दही – दही हे मॉइश्चरायझर म्हणून ओळखले जाते. काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा व्हिनेगर आणि बेसन पीठ दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित लावा आणि 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. हे कोपर आणि गुडघे साफ करण्यास मदत करू शकते.

बेकिंग सोडा – दुधामध्ये बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. आपल्या कोपर आणि गुडघ्यावर पेस्ट लावा आणि पाच मिनिटांनंतर धुवा. आपण आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावली पाहीजे. यामुळे गुडघ्याची त्वचा मऊ होण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल – दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी. यामुळे तुमच्या कोपऱ्यावरील आणि गुडघ्यांवरील काळपट पणामुळे दूर होतो.

कोरफड जेल – कोरफड जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर फायद्याचं ठरते. काळपटपणा दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चम्मच कोरफड जेल मिसळा. त्यानंतर याला मानेवर, कोपरावर, गुडघ्यावर लावा. कापसाच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता. 20 मिनटांनंतर कामट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do these 5 home remedies to remove blackheads on the knees and elbows)

'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.