Skin care : ‘हे’ घरगुती उपाय करा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा, वाचा याबद्दल अधिक !
दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया
मुंबई : आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्याचा वापर करून आपण कायमस्वरूपी आपली त्वचा चांगली करू शकतो. (Do this home remedy and get rid of all facial problems)
ग्रीन टीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांचा दाह कमी होतो. ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगली आहे. ग्रीन टीच्या पिशव्या पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. ग्रीन टीची पिशवी थंड झाल्यावर मुरुमावर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायम दूर होण्यास मदत होईल. हा खास उपाय आपण आठवड्यातून दोनदा करू शकतो. यामुळे मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.
पाच चमचे दही, दोन चमचे बदाम किंवा ऑलिव्ह तेल, एक ग्लास गरम पाणी, एक सूती रुमाल सर्वप्रथम, बदाम तेल दहीमध्ये मिसळा आणि चमच्याने चांगले मिक्स करा तयार केलेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांसाठी मालिश करा. यानंतर, एक सूती रुमाल कोमट पाण्यात भिजवून चेहरा स्वच्छ करा. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा केले तर चेहऱ्यावरील काळपट पणा, मुरूम, काळे डाग यांसारखे अनेक समस्या दूर होतील.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी
चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!#HairFall | #diabetes | #Health | #HealthCarehttps://t.co/GBfureUNxN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
(Do this home remedy and get rid of all facial problems)