ओठ काळपट होतात? मग, ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा!
ओठ म्हणजे आपल्या साैंदर्याचे प्रतिक आहे. प्रत्येकाला आपले ओठ गुलाबी, मुलायमदार आणि तजेलदार असावे वाटतात. यासाठी प्रत्येकजण विविध प्रयत्न करत असतो.
मुंबई : ओठ म्हणजे आपल्या साैंदर्याचे प्रतिक आहे. प्रत्येकाला आपले ओठ गुलाबी, मुलायमदार आणि तजेलदार असावे वाटतात. यासाठी प्रत्येकजण विविध प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उपाय करूनही आपल्याला हवे असलेले सुंदर ओठ मिळत नाहीत. त्यासाठी बरेचजण महागडे उत्पादने वापरतात. मात्र, तरीही विशेष काही फरक जाणवत नाही. आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे ओठ सुंदर आणि मुलायमदार होण्यास मदत होईल. (Do this home remedy to get beautiful and soft lips)
आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या ओठांना बदाम तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावले पाहिजे. ज्यामुळे आपले ओठ सुंदर दिसण्यास मदत होते. हे घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा बदाम तेल लागणार आहे. हे चांगले मिक्स करून घ्या आणि आपल्या ओठांवर लावा. हे तेल रात्रभर आपल्या ओठांवर राहूद्या आणि सकाळी उठल्यावर ओठ थंड पाण्याने धुवा. यामुळे ओठ्यांवरच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते. चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो. जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to get beautiful and soft lips)