Skin Care : चमकदार त्वचा पाहिजे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा, वाचा याबद्दल अधिक !

सध्याच्या हंगामात आपली त्वचा अधिक खराब होते. यामुळे या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते. त्वचा स्वच्छ करणे आणि मॉइश्चराइझ करणे खूप महत्वाचे आहे.

Skin Care : चमकदार त्वचा पाहिजे? मग 'हे' घरगुती उपाय करा, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 11:26 AM

मुंबई : सध्याच्या हंगामात आपली त्वचा अधिक खराब होते. यामुळे या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते. त्वचा स्वच्छ करणे आणि मॉइश्चराइझ करणे खूप महत्वाचे आहे. बरेच लोक या हंगामात त्वचेला मॉइश्चराइझर लावणे टाळतात. यामुळेच चेहऱ्यावरील चमक कमी होण्यास सुरूवात होते. या हंगामात आपल्या त्वचेची नेमकी काळजी कशी घ्यावी हे आपण आज बघणार आहोत. (Do this home remedy to get glowing and beautiful skin)

प्रथम आपले हात धुवा – आपला चेहरा धुण्यापूर्वी नेहमीच आपले हात साबणाने धुतले पाहिजे. यामुळे, आपल्या हातावरील बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू त्वचेच्या छिद्रांमधून निघून जातात. म्हणूनच आपले हात साबणाने धुणे महत्वाचे आहे.

क्लींजिंगच्या अगोदर मेकअप काढा – त्वचा साफ करण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे स्वच्छ करा. मेकअप काढून टाकल्याने त्वचेत जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होते. जर आपण दिवसभर घराबाहेर असाल तर अगोदर आपला चेहरा क्लींजिंग करून घ्या.

मॉइश्चरायझर – त्वचा स्वच्छ झाल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हंगाम कोणतेही असो आपण मॉइश्चरायझर हे वापरले पाहिजे. मॉइश्चरायझरमुळे आपली त्वचा नेहमी ताजी आणि तजेलदार राहते.

त्वचेला मालिश करा – त्वचेतील घाण पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेतील रक्त परिसंचरण वाढते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचेवर फेस मास्क लावा – फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा नेहमी स्वच्छ करा. यासह, फेस मास्कमध्ये असलेले पोषक आपल्या त्वचेमध्ये चांगले कार्य करतील. यामुळे आपला चेहरा चमकदार आणि तरूण दिसतो.

फेसपॅक – दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा बटाट्याची पेस्ट, एक चमचा ऑलिव्ह ऑइल सर्व सामग्री एकत्रित करून स्क्रब तयार करा. ही पेस्ट मान व चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get glowing and beautiful skin)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.