Hair Care Tips : शुष्क आणि निर्जीव केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपचार करून पाहा!

सुंदर केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केस अधिक चांगले होण्यासाठी निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे.

Hair Care Tips : शुष्क आणि निर्जीव केसांची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार करून पाहा!
हेअर केअर
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 12:51 PM

मुंबई : सुंदर केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केस अधिक चांगले होण्यासाठी निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांवर चांगली चमक येण्यास मदत होते. केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी आणि चांगले केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Do this home remedy to get rid of the problem of dry and lifeless hair)

सुंदर केस मिळवण्यासाठी आपण घरच्या काही साहित्याच्या आधारे हेअर मास्क तयार करू शकतो. हेअर मास्क तयार करण्यासाठी खोबरेल तेल आणि कोरफड घ्या. हे चांगले मिक्स करा आणि साधारण वीस मिनिटांसाठी हा हेअर मास्क केसांवर ठेवा आणि थंड पाण्याने केस धुवा. या हेअर मास्कमुळे केस चमकदार होण्यास मदत होते.

2 अंडी, 6 चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस घ्या. सर्वप्रथम अंडी फेटून घ्या. यात दही मिसळा. दही आणि अंडी व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यात लिंबू रस मिसळा. यामुळे स्काल्पची नीट स्वच्छता होते. या मिश्रणाला व्यवस्थित केसांमध्ये लावून घ्या आणि 30 मिनिटे थांबा. यानंतर केसांना व्यवस्थित शॅम्पू आणि कंडीशनर लावून स्वच्छ धुवून घ्या.

केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. बरेच लोक नियमितपणे तेल केसांना लावत नाहीत. कोरडे आणि निर्जीव केस होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. तेल लावल्याने आपल्या केसांना आणि टाळूला पोषण मिळते. केस निरोगी राहण्यासाठी आपण नियमितपणे मालिश केली पाहिजे.

केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. आहारात आपण अंडी, बदाम, लिंबू, संत्री, फळे, कॅप्सिकम, मसूर, सोयाबीन आणि आवळा यासारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यामुळे आपले केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.

(टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टर अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे वाचा !

(Do this home remedy to get rid of the problem of dry and lifeless hair)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.