Open Pores Home Remedies : ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
ज्यांची त्वचा तेलकट आहे. त्यांचे ओपन पोर्स कधीकधी खूप मोठे होतात आणि संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. या व्यतिरिक्त, सूर्यप्रकाश, वय किंवा आनुवंशिकतेमुळे, ओपन पोर्स मोठे होण्याची समस्या देखील असते.
मुंबई : ज्यांची त्वचा तेलकट आहे. त्यांचे ओपन पोर्स कधीकधी खूप मोठे होतात आणि संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. या व्यतिरिक्त, सूर्यप्रकाश, वय किंवा आनुवंशिकतेमुळे, ओपन पोर्स मोठे होण्याची समस्या देखील असते. यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सची समस्याही वाढते. (Do this home remedy to get rid of the problem of open pores)
चेहऱ्यावरील पोर्स बंद करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादने आहेत. मात्र, त्याचा परिणाम काही जास्त दिवस राहत नाही. जर तुम्हाला चेहऱ्यावरील पोर्स बंद करायचे असतील तर तुम्ही त्यासाठी काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
बेकिंग सोडा
चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. हे पीएच पातळी संतुलित करते, त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकते आणि मुरुमांची समस्या कमी करते. ते वापरण्यासाठी, 2 चमचे बेकिंग सोडा 2 चमचे कोमट पाण्यात मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर वर्तुळाकार हालचालीने लावा आणि 5 ते 7 मिनिटे सोडा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे आठवड्यातून दोनदा करा. यामुळे त्वचा चांगली होईल.
अॅपल सायडर व्हिनेगर
ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर देखील खूप चांगले मानले जाते. तुम्ही ते टोनर म्हणून रोज त्वचेवर लावू शकता. यामुळे तुमचे छिद्र लहान होतील आणि त्वचा चमकेल. ते वापरण्यासाठी, एक चमचे अॅपल सायडर व्हिनेगर एक चमचे पाण्यात मिसळा. कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्याचप्रमाणे हे रोज वापरा.
बर्फ
बर्फ ओपन पोर्स बंद करण्यासाठी फायदेशीर आहेत. ते तुमची त्वचा घट्ट करते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते. आठवड्यातून किमान दोनदा फ्रीझरमधून बर्फ बाहेर काढा आणि चेहऱ्यावर गोलाकार हालचालींनी मालिश करा. याचा खूप फायदा होईल.
अंडी
त्वचेची ही समस्या दूर करण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या भागाचाही खूप उपयोग होतो. त्याचा वापर करण्यासाठी, अंड्याचा पांढरा भाग बाहेर काढा आणि त्याला फेटा. चेहरा पूर्णपणे धुवून झाल्यावर चेहऱ्यावर लावा आणि वर एक टिश्यू ठेवा. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to get rid of the problem of open pores)