Hair care : पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

कमी वयामध्येच केस पांढरे होण्याच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात.

Hair care : पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!
केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 6:43 PM

मुंबई : कमी वयामध्ये केस पांढरे होण्याच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. बर्‍याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. परंतु, जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि भावनिक ताण हे देखील केसांच्या या समस्येचे कारण ठरू शकते. विशेष म्हणजे केसांची काळजी न घेतल्यामुळे देखील केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Do this home remedy to get rid of the problem of white hair)

पांढरे केस होण्याची समस्या दूर होण्यासाठी आपण केसांना बदाम तेल, जास्वंदाचे तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावले पाहिजे. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. हे तेल आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावले पाहिजे. हे तेल नेहमी कोमट करून केसांची साधारण दहा मिनिटे मालिश करा. यामुळे पांढरे केस आणि केस गळती थांबण्यास मदत होते.

आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि 20 मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा हे डोक्याला लावा. नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पाने टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या दहा मिनीटं आधी या तेलानं डोक्याची मालिश करा.पांढरे केस काळे करण्यासही काळे तीळ खूप उपयुक्त आहेत.

नारळ तेल आणि लिंबू एकत्र मिसळून केसांमध्ये लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. या मिश्रणामध्ये नारळ तेलाचे दोन भाग आणि लिंबाचा रस एक भाग घालावा. कढीपत्ता नारळाच्या तेलात घाला आणि तो तडतडेपर्यंत गरम होऊ द्या. नंतर हे तेल गाळून त्याने केसांची मालिश करा. सुमारे 30-45 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोनदा या प्रक्रियेचे अनुसरण करा. यामुळे केसांच्या मुळांची ताकद वाढते आणि केसांना आवश्यक पोषण मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Do this home remedy to get rid of the problem of white hair)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.