Skin Care : हातावरील काळपटपणा काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

आपण सर्वजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण विशेष करून फक्त चेहऱ्याच्याच त्वचेची काळजी घेतो.

Skin Care : हातावरील काळपटपणा काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
हातावरील काळपटपणा
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 3:52 PM

मुंबई : आपण सर्वजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण विशेष करून फक्त चेहऱ्याच्याच त्वचेची काळजी घेतो. हाताच्या त्वचेकडे मात्र, पूर्णपणे दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्या हाताची त्वचा दिवसेंदिवस काळपट होत जाते. मग आपण पार्लरमध्ये जाऊन उपचार घेतले तरीही काही विशेष फरक पडताना दिसत नाही. (Do this home remedy to remove dark circles on the hands)

आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या हाताचा काळपटपणा जाण्यास मदत होईल. हळद तीन चमचे, मध चार चमचे, लिंबाचा रस दोन चमचे आणि साखर सहा चमचे लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या दोन्ही हातावर ही पेस्ट लावा. साधारण एक ते दोन तास ही पेस्ट आपल्या हातांवर तशीच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने हात धुवा. आपण सतत हा उपाय आठ दिवस केला तर आपल्या हातांवरील काळपटपणा निघून जाण्यास नक्की मदत होईल.

लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचेच्या टोनमध्ये सुधारण्यास मदत करतात. लिंबाचा रस हातांवर लावा आणि हळू हळू मालिश करा आणि 10 मिनिटे तसेच सोडा.  त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा असे केल्याने काळपटपणा कमी होण्यास मदत होते. दही हे मॉइश्चरायझर म्हणून ओळखले जाते. काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा व्हिनेगर आणि बेसन पीठ दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित लावा आणि 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.

आपल्यापैकी बर्‍याचजणांना हे माहित आहे की अॅपल व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे अॅपल व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळावे लागेल. हे मिश्रण हातांवर लावा. साधारण दहा मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने हात धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे. यामुळे हातावरील काळपटपणा जाण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Do this home remedy to remove dark circles on the hands)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.