Skin Care : तुमची त्वचा तेलकट आहे? मग, ‘हे’ फेसपॅक नक्कीच वापरा!
हेल्दी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करतो.
मुंबई : हेल्दी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करतो. मात्र, जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्याची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागते. कारण तेलकट त्वचेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी काही खास टिप्स वापरा…(Do this home remedy to remove the oiliness of the skin)
तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बेसन पीठ आणि दह्याचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे दही घ्या. त्यानंतर हे चांगले मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक आपण दररोज देखील लावू शकतो.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात स्क्रब करण्याची आवश्यकता नसते. परंतु चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब करणे फायदेशीर आहे. जर, तेलकट त्वचा असेल तर दही, ओट्स आणि मध यांची जाडसर पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट चेहर्यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहु द्या. यानंतर, हलक्या हाताने किंवा बोटांनी चेहरा स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to remove the oiliness of the skin)