Skin Care : चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!
चेहऱ्यावरील तीळ वेगळ्या प्रकारे आपले सौंदर्य वाढवते. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर खूप जास्त तीळ असतात. अशा परिस्थितीत सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होते.
मुंबई : चेहऱ्यावरील तीळ वेगळ्या प्रकारे आपले सौंदर्य वाढवते. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर खूप जास्त तीळ असतात. अशा परिस्थितीत सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होते. चेहऱ्यावरील हे तीळ काढण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपचार करतात पण चेहऱ्यावरील तीळ काही कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरगुती उपचार घेऊन चेहऱ्यावरील तीळ कसे काढावे. (Do this home remedy to remove unwanted moles on the face)
चेहऱ्यावरील तीळ आठ दिवसांमध्ये कमी करण्यासाठी आपण निरमा आणि हळदीची पेस्ट आपल्या तिळांवर लावली पाहिजेत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील तिळांची समस्या कायमची दूर होईल. ही पेस्ट घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी चमचा हळद आणि अर्धा चमचा निरमा लागणार आहे. ही पेस्ट साधारण वीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा.
ही पेस्ट आपण सतत आठ दिवस आपल्या चेहऱ्यावर लावली तर तीळाची समस्या कायमची दूर होईल. मध आणि सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तीळ कमी होण्यास मदत होईल. लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तिळावर लावा.
सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्यास तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.व्हिनेगरचा वापर करूनदेखील तीळ हटवले जाऊ शकतात. सुरूवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा. कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर तिळावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.
कांद्याचा रस केवळ केसांसाठी फायदेशीर नाही तर चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी कांद्याचा रस तीळावर कापसाच्या साहाय्याने लावावा व सुमारे दोन तासानंतर ते पाण्याने धुवा. हा उपाय दररोज करा आणि काही दिवसातच तुम्हाला तिळापासून मुक्तता मिळेल.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to remove unwanted moles on the face)