बाजारात मिळणाऱ्या उटण्याचा कंटाळा आलाय? , घरच्या घरी बनणारे 4 उटण्याचे प्रकार नक्की ट्राय करा
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.
मुंबई : दिवाळी म्हणजे रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ. याव्यतिरिक्त दिवाळीसाठी उटणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी लोक घरीच उटणे तयार करायचे. पण हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.
हळद- तिळाचे उटणे
मिक्सरच्या भाड्यांमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर अंग स्वच्छ धुऊन घ्या. या उटण्याच्या वापरामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होण्यास मदत मिळते.
हळद, तिळाचे तेल आणि चंदन
वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तयार आहे तुमचे घरगुती उटणे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळद, चंदन आणि तिळाच्या तेलाला भरपूर महत्त्व आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वी चंदनाचा उपयोग केला जात असे. चंदनामधील गुणर्धमामुळे तत्वचेला थंडावा मिळतो.
हळद, चंदन, तांदळाचे पीठ, बेसन, गुलाब पाणी
अर्धा मोठा चमचा तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी, चंदन पावडर आणि तिळाच्या तेलाचे एक ते दोन थेंब मिक्स करा. सर्व सामग्री नीट एकजीव करा. चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर हे उटणे लावा आणि अभ्यंगस्नान करा. तुम्ही रक्तचंदनाचाही उपयोग करू शकता. यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत मिळते. हे उटणे एक उत्तम स्क्रबर म्हणून काम करेल.
हळद, चंदन, तांदळाचे पीठ, गुलाब पाणी व दुधाची मलई
दुधाच्या मलईमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. एका वाटीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी व दुधाची मलई देखील मिक्स करा. सर्व सामग्री नीट मिक्स करून उटणे तयार करा आणि संपूर्ण शरीरावर लावा. यातील नैसर्गिक सामग्रींमुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. याव्यतिरिक्त आपण मुलतानी माती, दही, मसूर डाळ, मध किंवा दुधापासून घरगुती उटणे तयार करता येईल.
ही काळजी घ्या :
काही लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना नैसर्गिक सामग्रींमुळेही अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नेहमी पॅच टेस्ट करून पाहावी. त्वचेसाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या हाताच्या त्वचेवर पेस्ट किंवा लेप लावून पाहावा. त्वचेवर जळजळ किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास उपाय करणं टाळावं.
इतर बातम्या :
फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा
Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल