Skin Care : डोळ्यांचा मेकअप करताना ‘या’ चुका करू नका अन्यथा लुक खराब होऊ शकतो!

बहुतेक मुलींना मेकअप करायला आवडतो. हे तुमचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही मेकअपचे शौकीन असाल, तर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप करायला नक्कीच आवडत असेल. डोळे सुंदर दिसण्यासाठी आयलाइनर, मस्करा, आयशॅडो वापरा. मात्र, डोळ्यांचा मेकअप करताना आपण काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Skin Care : डोळ्यांचा मेकअप करताना 'या' चुका करू नका अन्यथा लुक खराब होऊ शकतो!
मेकअप
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 7:57 AM

मुंबई : बहुतेक मुलींना मेकअप करायला आवडतो. हे तुमचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही मेकअपचे शौकीन असाल, तर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप करायला नक्कीच आवडत असेल. डोळे सुंदर दिसण्यासाठी आयलाइनर, मस्करा, आयशॅडो वापरा. मात्र, डोळ्यांचा मेकअप करताना आपण काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. डोळ्यांचा मेकअप करताना खालील टिप्स फाॅलो करा. (Don’t make these mistakes when doing eye makeup)

क्लासी लुक

जर तु्म्ही डोळ्यांना क्लाकी लुक देऊ इच्छित असाल तर शमिरी कलरची निवड करु शकता. पण कलर टोन अधिक डार्क नसला पाहिजे. आजकाल स्मोकी मेकअपमध्ये मीडियम टोन कलर ट्रेंडला महिलांची अधिक पसंती आहे. हवे असल्यास डोळ्यांच्या बाहेरील कॉर्नरला डार्क शेड्स देऊ शकता. यासोबतच पापण्यांना शॉर्प लुक द्या, त्यामुळे तुमचा लुक हॉट आणि स्टायलिश दिसेल.

स्वच्छतेची काळजी घ्या

जर तुम्ही मेकअप दरम्यान स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर डोळ्यांना नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत मेकअप करताना चेहरा आणि हात नीट धुवा आणि त्यानंतर मेकअप लावा. जर तुम्ही हे केले नाही तर हातातील जीवाणू डोळ्यांच्या संपर्कात येऊ शकतात.

इतरांचे साहित्य वापरू नका

तुमचा मेकअप कधीही इतरांसोबत शेअर करू नका. कारण असे केल्याने संसर्ग पसरण्याची भीती असते. आपल्याकडे कोणतेही उत्पादन नसल्यास प्रथम खरेदी करा. कोरोनाच्या काळात तर इतरांचे मेकअपचे साहित्य घेणे टाळा आणि आपले मेकअप साहित्य देखील कोणाला देऊ नका.

रात्री मेकअप काढून झोपा

ब्यूटीशियन अनेकदा रात्री मेकअप काढून झोपावे अशी शिफारस करतात. जर तुम्ही मेकअप न काढता झोपलात तर यामुळे डोळ्यांमध्ये खाज, जळजळ होऊ शकते. मेकअप ठेऊन झोपल्याने त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत रात्री मेकअप काढणे अत्यंत आवश्यक आहे.

मेकअप रीमूव्हर

आपले डोळे खूप संवेदनशील असतात. यामुळे शक्यतो कापसाने किंवा मेकअप रीमूव्हरचा वापर करून आपण डोळयांवरचा मेकअप काढू शकतो. डोळ्यांवरील मेकअप काढण्यासाठी आपण तेलाचा उपयोग देखील करू शकता. डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यासाठी तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Don’t make these mistakes when doing eye makeup)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.