Hair Loss : पावसाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी अंडी अत्यंत फायदेशीर!

पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे केस गळती. पावसाळ्याच्या हंगामात अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात.

Hair Loss : पावसाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी अंडी अत्यंत फायदेशीर!
hair loss
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 7:45 AM

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे केस गळती. पावसाळ्याच्या हंगामात अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. केस गळती रोखण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केस गळती कमी होत नाही. केस गळती रोखण्यासाठी अंडी अत्यंत फायदेशीर आहेत. (Egg hair mask is beneficial for reducing hair loss)

अंडे केसांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यांना मजबूत बनवतात. केसांमध्ये केराटिनचे प्रमाण वाढवून अंडी केसांच्या वाढीलाही गती देतात. जर आपल्याला केस गळतीची समस्या निर्माण झाली असेल तर आपण केसांना अंडी लावून ही केस गळतीची समस्या दूर करू शकतो.

अंडी केसांना लावण्यासाठी आपल्याला दोन अंडी लागणार आहेत. दोन अंड्यामध्ये तीन चमचे लिंबाचा रस मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण केसांना लावा. ज्यामुळे केस गळतीची समस्या कायमी दूर होईल. आपण आठ दिवसातून दोन वेळा आपल्या केसांना अंडी लावली पाहिजे. ज्यामुळे केस गळती दूर होईल. अनेकदा तुमचे केस मध्येच तुटू लागतात किंवा कोरडे झाल्यामुळे त्यांना फाटे फुटतात.

केसांना फाटे फुटले की केसांची वाढ रोखली जाते. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे ते निस्तेज दिसू लागतात. मात्र अंड्यातील ल्यूटीनमुळे केस गळणे थांबते आणि केस घनदाट दिसू लागतात. दोन अंड्याचा पांढरा भाग आणि चार चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून एक तासाने केसांना शॅंपू करा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यामुळे तुमचे केस गळणे आपोआप थांबेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Egg hair mask is beneficial for reducing hair loss)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.