Skin Care Tips | खजूरमध्ये या गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि चमकदार त्वचा मिळवा!
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची (Skin) अधिक काळजी ही घ्यावी लागते. उन्हाळ्यात चमकदार त्वचा खूप खराब होते. खराब झालेली त्वचा चांगली करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, जास्त प्रमाणात रसायनयुक्त क्रीम (Chemical cream) लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची (Skin) अधिक काळजी ही घ्यावी लागते. उन्हाळ्यात चमकदार त्वचा खूप खराब होते. खराब झालेली त्वचा चांगली करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, जास्त प्रमाणात रसायनयुक्त क्रीम (Chemical cream) लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहेत. घरगुती उपाय केल्याने आपली त्वचा सुंदर आणि चमकदार राहण्यास मदत होते. तुम्हालाही त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय वापरायचे असतील तर खजूरची मदत घ्या. खजूर जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ते आपल्या त्वचेसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे.
खजूर आणि हळद
खजूर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी काम करते. उन्हाळ्यामध्ये टॅनमुळे आपला रंग काळा होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आपण खजूरची पेस्ट, चिमूटभर हळद आणि दोन चमचे कच्चे दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपल्या चेहऱ्यावर मालिश करा. थंड पाण्याने चेहरा धुवा.
खजूर, मलई आणि लिंबू
खजूर, मलई आणि लिंबू देखील चेहरा चमकदार बनवू शकतो. एका भांड्यात खजूराची पेस्ट घ्या आणि त्यात दोन चमचे मलई घाला, त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला, हा मास्क तयार केल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे राहू द्या, आता थोडे कच्चे दूध घ्या आणि स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर टॅन कमी होऊन चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. हा मास्क आठ दिवसातून एकदा लावा.
खजूर आणि कोरफड
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. कोरफड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. तीन खजूर, अर्धा कप दूध आणि दोन चमचे कोरफड जेल या तीन गोष्टींचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे त्वचेवरील पिंपल्स जाण्यास मदत होते. या उपाय आपण आठ दिवसांमधून दोनदा करू शकतो.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)