जवस आणि बेसन पीठाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
आपल्याला जर खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास नक्की मदत होईल.
मुंबई : आपल्याला जर खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास नक्की मदत होईल. आपल्याला माहीती आहे का? की, जवस हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर जवसाचा फेसपॅक चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्की मदत मिळेल. (Face pack of flax and gram flour is beneficial for the skin)
जवसाचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे जवसाचे पावडर, दोन चमचे बेसन पीठ आणि पाच चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहऱ्या धुवा. ही पेस्ट आपण आठ दिवसातून दोन वेळा लावली पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. चेहर्यावर दही लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास आणि त्वचा मॉइस्चराइज होण्यास मदत होते. बाजारातील ब्लीचमुळे आपल्या चेहऱ्यावर काही साइड इफेक्ट होत असतील तर आपण 10-15 मिनिटांसाठी चेहर्यावर दही लावा किंवा दह्यामध्ये बेसन पीठ मिक्स करा.
ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा आणि यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. ही पेस्ट एका ब्लीच प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर कार्य करते. दूध आणि हळदीची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर पेस्ट कोरडी झाल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठदिवसांमधून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Face pack of flax and gram flour is beneficial for the skin)