चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, गुलाब पाणी आणि दह्याचा फेसपॅक फायदेशीर!

सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, गुलाब पाणी आणि दह्याचा फेसपॅक फायदेशीर!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 4:23 PM

मुंबई : सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. (Face pack of olive oil, rose water and curd is beneficial for removing wrinkles on the face)

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल, गुलाब पाणी आणि दही एकत्रित मिक्स करावे आणि हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर व मानेवर व्यवस्थित लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर किमान 40 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज कमी होतील. दह्यामध्ये उपस्थित लॅक्टिक आम्ल आणि इतर नैसर्गिक एंजाइम्स आपल्या त्वचेच्या पेशी पूर्णपणे शुद्ध करतात आणि त्यांना नैसर्गिकपणे घट्ट करतात.

दही आपल्या त्वचेवरील डागही कमी करते, ज्यामुळे आपली त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनते. त्याच वेळी, ऑलिव्ह ऑईलमध्ये अ, डी, ई आणि के जीवनसत्त्वे भरपूर असतात आणि त्यातील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.

आपले वय वाढत असताना, तोंडावर सुरकुत्यादेखील दिसू लागतात. जेव्हा हे आपल्या लक्षात येते, तेव्हा आपल्या त्वचेतील लवचिकता आणि मॉइश्चरायझर कमी होऊ लागलेले असते. ज्यामुळे आपली त्वचा सैल होते आणि शरीरावर सुरकुत्या दिसू लागतात. बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि अयोग्य आहार यामुळे कधीकधी लहान वयातच या सुरकुत्यांची समस्या सुरू होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of olive oil, rose water and curd is beneficial for removing wrinkles on the face)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.