Skin Care : पपई आणि कोरफडचा ‘हा’ फेसपॅक त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा

कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात.

Skin Care : पपई आणि कोरफडचा 'हा' फेसपॅक त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:15 AM

मुंबई : कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. आपण कोरफडची विविध फेसपॅक घरी तयार करू शकतो आणि सुंदर त्वचा मिळू शकतो. (Face pack of papaya and aloe is beneficial for the skin)

जसे कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तशीच पपई देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण कोरफड आणि पपईचा फेसपॅक घरी तयार करून सुंदर त्वचा मिळू शकतो. यासाठी एक पिकलेली पपई घ्या आणि लहान चौकोनी तुकडे करा. त्यानंतर यामध्ये कोरफडचा जेल मिक्स करा. याचे चांगले मिश्रण तयार करून बारीक पेस्ट तयार करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण त्वचेला लावा. अर्ध्या तासांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात. कोरफड जेलमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखे देखील वापरू शकता.

सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of papaya and aloe is beneficial for the skin)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.