गुलाब पाणी, चंदन पावडर आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा !

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागातली साैदर्य उत्पादने वापरली पाहिजेत, असे काही नसून आपण सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करू शकतो.

गुलाब पाणी, चंदन पावडर आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा !
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 8:12 AM

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागातली साैदर्य उत्पादने वापरली पाहिजेत, असे काही नसून आपण सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला खर्च देखील लागत नसून घरी असलेल्या साहित्याच्या आधारे आपण फेसपॅक तयार करू शकतो. (Face pack of rose water and sandalwood powder is beneficial for the skin)

घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला गुलाब पाणी, चंदन पावडर, मुलतानी माती, कोरफड आणि हळद लागणार आहे. फेसपॅक घरी तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून एकदा लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा चांगली आणि तजेलदार होण्यास मदत होते.

नाचणी फेस मास्क तयार करण्यासाठी प्रथम नाचणीची बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यामध्ये उपस्थित असलेल्या फिनोलिक आम्ल आणि फ्लेव्होनॉइड चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डीप पोर्स बंद करण्याचे काम करतात. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्यास तुमची त्वचा चमकदार व मऊ होईल.

आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Face pack of rose water and sandalwood powder is beneficial for the skin)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.