Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips | कोंडयाचा त्रास दूर करण्यासाठी मेथीचे हे 3 हेअर मास्क फायदेशीर, वाचा अधिक!

कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही मेथी आणि लिंबाचा हेअर मास्क बनवू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड, पोटॅशियम, लोह आणि तांबे असतात. हे कोंडा दूर करण्यास मदत करते, यासाठी तुम्हाला 1 चमचे मेथी दाणे आणि 1 चमचे लिंबाचा चांगली मिक्स करून घ्या. मेथी दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यात लिंबू टाकून पेस्ट बनवा. 30 मिनिटे ही पेस्ट केसांवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा.

Hair Care Tips | कोंडयाचा त्रास दूर करण्यासाठी मेथीचे हे 3 हेअर मास्क फायदेशीर, वाचा अधिक!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 2:55 PM

मुंबई : केसांमधील कोंड्यामुळे जवळपास सर्वजण त्रस्त असतात. केसांमध्ये (Skin) कोंड्याची समस्या फक्त हिवाळ्यातच होते असे नाही, उन्हाळ्यातही या समस्येला सामोरे जावे लागते. प्रदूषण, धूळ, सूर्यप्रकाश आणि घाम यामुळे केसांमध्ये कोंड्यासारख्या समस्यांना (Problem) सामोरे जावे लागते. अनेक वेळा कोंड्यामुळे खाज इतकी वाढते की सहन करणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत अनेकजण महाग केमिकलयुक्त गोष्टींची खरेदी करून कोड्याचा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो. म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. हे कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर (Beneficial) ठरतात. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी मेथी खूप जास्त फायदेशीर ठरते. चला जाणून घेऊयात केसांसाठी मेथीचे असलेले फायदे…

मेथी दाणे आणि लिंबू

कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही मेथी आणि लिंबाचा हेअर मास्क बनवू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड, पोटॅशियम, लोह आणि तांबे असतात. हे कोंडा दूर करण्यास मदत करते, यासाठी तुम्हाला 1 चमचे मेथी दाणे आणि 1 चमचे लिंबाचा चांगली मिक्स करून घ्या. मेथी दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यात लिंबू टाकून पेस्ट बनवा. 30 मिनिटे ही पेस्ट केसांवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

अंडी आणि मेथी

2 चमचे मेथीचे दाणे आणि अंड्यातील पिवळ बलक घ्या. मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा, त्यात अंड्यातील पिवळ बलक घाला आणि ते चांगले मिसळा. ते टाळू आणि केसांना लावा. 30 ते 40 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. अंडी केसांचा कोरडेपणा दूर करते.यामुळे आपल्या केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

मेथी आणि कोरफड

2 चमचे मेथीचे दाणे आणि 2 चमचे कोरफड जेल मिक्स करून घ्या. मेथी एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी बारीक करून पेस्ट बनवा, त्यात कोरफडीचे जेल टाका, ही पेस्ट टाळू आणि केसांना लावा. 30 मिनिटे केसांवर राहू द्या. नंतर केस धुवा. कोरफड जेलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये अमीनो अॅसिड असल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.