Flower Hair Care: जास्वंदाच्या फुलांनी केसांच्या अनेक समस्या दूर होतील; ‘या’ पद्धतीने करा वापर !

लांबसडक अन् दाट केस चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात. मुलं असो की मुली, केस सगळ्यांनाच प्रिय असतात. परंतु कधीकधी चुकीच्या जीवनशैलीसह रसायनांच्या वापरामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. केसगळतीवर जास्वंदाच्या फुलांपासून रामबान उपाय करता येतो.

Flower Hair Care: जास्वंदाच्या फुलांनी केसांच्या अनेक समस्या दूर होतील; ‘या’ पद्धतीने करा वापर !
जास्वंदाच्या फुलांनी केसांच्या अनेक समस्या दूर होतील
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 9:05 PM

धूळ-प्रदूषण हे केस गळण्याचे (Hair loss) प्रमुख कारण बनते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उत्पादने उपलब्ध आहेत. पण, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरगुती उपायांनीही केसांचे आरोग्य सुधारू शकता. केसांची चमक गेली असेल, केस गळत असतील तर जास्वंदाच्या फुलांचा (Jaswand flowers) वापर करा. यामुळे केस पुन्हा लांब आणि दाट होण्यास मदत होईल. जास्वंदाच्या फुलांचा वापर कसा करावा याबाबत माहिती असल्यास, आपले केस गळती (Hair Loss) थांबविता येईल.

लांबसडक सुंदर आणि चमकदार केसांसाठी बाजारातून आणलेल्या रसायनयुक्त साधनांचा वापर करण्या ऐवजी आपल्या परस बागेतील जास्वंदाच्या फुलांचा वापर करून केसांचे आरोग्य निरोगी राखता येणे सहज शक्य आहे. जाणून घ्या, जास्वंदाचा केसांसाठी कसा उपयोग करता येतो आणि त्याचा केसांच्या आरोग्यासाठी कसा उपयोग करता येईल.

चमकदार केसांसाठी अशी वापरा जास्वंदाचे फुलं

केसांची चमक आणि ओलावा कमी झाला असेल तर जास्वंदाच्या पाकळ्या बारीक करा. त्यानंतर त्याची एलोवेरा जेलमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा आणि कोरडा होऊ द्या.

हे सुद्धा वाचा

सुमारे एक तासानंतर धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा हेअर मास्क लावल्याने केसांना चमक आणि आर्द्रता परत येईल.

शॅम्पूऐवजी वापरा जास्वंद चूर्ण

केसांमध्ये शॅम्पू केल्याने केस तुटतात आणि गळतात, तर केमिकल शॅम्पूऐवजी केस जास्वंदाने धुवा. यासाठी जास्वंदाचे फूल सुकवून पावडर बनवावी.

त्यानंतर बेसनामध्ये ही पावडर मिसळून केस धुवा. यामुळे केस देखील स्वच्छ होतील आणि ते मजबूत होतील.

कोंडा दूर होईल

जर तुम्हाला कोंडयाचा त्रास होत असेल तर जास्वंदाचे फूल बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये मेंदी पावडर आणि लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळावर लावा आणि सुकू द्या. साधारण तासाभरानंतर केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने केसांचा कोंडा कमी होईल.

आवळा आणि जास्वंद

केस वाढ खुंटली असेल तर, आवळा पावडरमध्ये जास्वंदाच्या फुलांची पावडर एकत्रित पेस्ट करून केसांना लावा. ही पेस्ट लावल्याने केसांना पोषण मिळते. यासोबतच केसांची वाढही चांगली होते.

Non Stop LIVE Update
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.