Skin Care Tips : ‘या’ 10 टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. खूप साखर किंवा चॉकलेट खाण्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूमाची समस्या निर्माण होऊ शकते.
मुंबई : त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. खूप साखर किंवा चॉकलेट खाण्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूमाची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचेची काळजी घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरील समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या काही सवयींमध्ये थोडा बदल केला पाहिजे. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. (Follow 10 tips and get beautiful skin)
1. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्यावरील मेकअप नेहमीच काढला पाहिजे. जर आपण रात्री मेकअप न काढताच झोपलो तर आपल्या त्वचेचा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
2. बरेच लोक सनस्क्रीन लावणे टाळतात आणि हीच चुक होते. सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी अत्यंत आवश्यक असते. आपण दररोज चेहऱ्याला सनस्क्रीन लावली पाहिजे, मग हंगाम कोणाताही असो.
3. जर आपल्या चेहऱ्यावर मुरूम असेल तर आपण सतत चेहऱ्याला हात लावणे टाळले पाहिजे. कारण सतत चेहऱ्याला हात लावल्यामुळे मुरूमाची समस्या वाढण्याची शक्यता असते.
4. जर आपल्याला त्वचा स्वच्छ ठेवण्यास आवडत असेल तर ही अत्यंत चांगली बाब आहे. मात्र, सतत चेहऱ्या धुणे देखील चुकीचे आहे.
5. चेहऱ्यासाठी आपण जी साैंदर्य उत्पादने वापरतो, ती खरोखरच आपल्या चेहऱ्याला सुट होतात की, नाही हे एकदा चेक केले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा साैंदर्य उत्पादनामुळे चेहरा अधिक खराब होण्याची शक्यता असते.
6. मॉइस्चराइजर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण मॉइस्चराइजर वापरले पाहिजे.
7. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी झोप ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तर आपली त्वचा खराब होण्यास सुरूवात होते.
8. आंघोळ झाल्यावर आपली त्वचा कोरडी करण्यासाठी जाड कपड्याने त्वचा पुसणे टाळा. यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
9. चेहऱ्यावर शक्यतो कमी वेळ मेकअप ठेवा. जर मेकअप चेहऱ्यावर जास्त वेळ राहिला तर त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता असते.
10. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास आणि त्वचा मुलायमदार होण्यास मदत होईल.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!
Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!#haircare | #Dandruff | #HairProblems | #BeautySecrets https://t.co/CCKZp4C5hX
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Follow 10 tips and get beautiful skin)