नाका जवळील त्वचेचा तेलकटपणा घालवण्यासाठी ‘या’ घरगुती टिप्स फाॅलो करा
तेलकट त्वचेमुळे अनेकजण त्रस्त असतात. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग आणि काळवटपणा येतो. त्यामध्येही नाकाच्या भोवती असलेली त्वचा अधिक तेलकट होते.
मुंबई : तेलकट त्वचेमुळे अनेकजण त्रस्त असतात. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग आणि काळवटपणा येतो. त्यामध्येही नाकाच्याभोवती असलेली त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे नाकाच्या त्वचेत छिद्र तयार होण्यास सुरवात होते. ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे आैषध उपचार देखील घेतले जातात. मात्र, म्हणावे तसे काही फरक दिसून येत नाहीत. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे नाकाभोवतीची तेलकट त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Follow these homemade tips to reduce the oiliness of the skin near the nose)
लिंबू लिंबू एक नैसर्गिक एक्सफोलीएटर म्हणून कार्य करते जे त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: नाकाच्याभोवती त्वचेवर असलेला तेलकट पणा काढण्यासाठी लिंबू अतिशय फायदेशीर आहे. एका वाटीत लिंबाचा रस काढून घ्या आणि कापसाच्या मदतीने लिंबाचा नाकाच्या सभोवतालच्या त्वचेवर लावा. साधारण 25 ते 30 मिनिटे लिंबाचा रस तसाच त्वचेवर लावा. याप्रकारे लिंबाचा रस दररोज आपल्या त्वचेवर लावा.
मध आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमितपणे मधाचा वापर करू शकता. त्यात अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. यामुळे आपल्या नाका जवळच्या त्वचेवर तेलकटपणा होणार नाही. दररोज नाकाभोवती काही वेळ मधाने मालिश करा. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हा उपाय करू शकता. हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.
दही दहीमध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत जे नाकाभोवतीची तेलकट त्वचा चांगली करतात. यासाठी, आपल्याला एक चमचे दह्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध मिसळावा लागेल. हे मिश्रण चांगले मिसळा आणि ते सुमारे 15 ते 20 मिनिटे नाकावर ठेवा आणि काही वेळाने ते पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल.
चंदन चंदनचा उपयोग स्किनकेअरसाठी केला जातो. यामुळे तुमची त्वचा चमकते आणि मऊ होते. यासाठी, आपल्याला एक चमचे चंदन पावडरमध्ये थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करावी लागेल. यानंतर हे मिश्रण 15 मिनिटे ठेवा आणि ते पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्सhttps://t.co/tw56yxMJJr#ImmunityBooster #ImmunityTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2020
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Follow these homemade tips to reduce the oiliness of the skin near the nose)