Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या कोरियन टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
उन्हाळ्यात त्वचा (Skin) तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. या ऋतूमध्ये त्वचेवर अतिरिक्त तेलाची समस्या कायम राहते, ज्यामुळे हळूहळू मुरुमाची (Pimples) समस्या निर्माण होते. पुरळ आणि निस्तेजपणामुळे त्वचा निर्जीव दिसते.
मुंबई : उन्हाळ्यात त्वचा (Skin) तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. या ऋतूमध्ये त्वचेवर अतिरिक्त तेलाची समस्या कायम राहते, ज्यामुळे हळूहळू मुरुमाची (Pimples) समस्या निर्माण होते. पुरळ आणि निस्तेजपणामुळे त्वचा निर्जीव दिसते. असे म्हटले जाते की हा ऋतू त्वचेचेसाठी सर्वात जास्त कठिण असतो. उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी कोरियन सौंदर्य फायदेशीर आहेत. आजकाल कोरियन (Korean) ब्युटी टिप्स फॉलो करणे हा ट्रेंड बनला आहे, कारण त्या खूप फायदेशीर टिप्स मानल्या जातात.
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहते!
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आपण सतत चेहरा धुतला पाहिजे. असे म्हटले जाते की कोरियन ब्युटी रूटीनमध्ये दिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ करण्याची सूचना दिली जाते. असे केल्याने चेहऱ्यावरील बॅक्टेरिया निघून जातात आणि पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.
शीट मास्क त्वचेसाठी फायदेशीर
कोरियन ब्युटी रूटीनमध्ये शीट मास्कचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. शीट मास्क लावल्याने त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते आणि कोणत्याही प्रकारच्या जळजळीपासूनही सुरक्षित राहते, उन्हाळ्यात त्वचेवर जळजळ होण्याची जास्त शक्यता असते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर सिरम लावा
उन्हाळ्याच्या हंगामात आपण एसीचा वापर जास्त करतो. तज्ञांच्या मते एसीच्या थंडपणामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. अशा स्थितीत त्वचेवर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर सिरम लावा. तुम्हाला बाजारात अनेक उत्तम कोरियन सीरम मिळू शकतात. जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
हा उपाय देखील फायदेशीर
उन्हाळ्याच्या हंगामात रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला दुधावरची साय लावणे देखील खूप जास्त फायदेशीर आहे. कारण यामुळे चेहरा कोमल होतो आणि त्वचेवरील टॅन देखील दूर होण्यास मदत होते. मात्र, जर आपली त्वचा तेलकट असेल तर हे करणे टाळा नाहीतर त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता निर्माण होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Skin care : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेवरील तेज टिकवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!
आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी सत्तू फायदेशीर, जाणून घ्या त्याचे 5 फायदे!