Hair | दिवसभर केसांची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी या टिप्स फाॅलो करा!
जर तुम्ही दिवसभर केस विंचरले नाहीतर आपल्या केसांमध्ये गुंता हा मोठ्या प्रमाणात होतो. केसांमध्ये गुंता टाळण्यासाठी आपण नेहमीच आपल्या केसांना तेल लावायला हवे. तेल मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते. तसेच केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल लावू शकता आणि काही मिनिटांसाठी तुमच्या टाळूची मालिश करू शकता.
मुंबई : व्यस्त जीवनशैलीमध्ये (Lifestyle) आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे काम आहे. आपण त्वचेची ज्याप्रमाणे काळजी घेतो, तशी केसांची अजिबात घेत नाहीत. एकदा सकाळी केस (Hair) बांधून टाकले की, परत आपण केसांकडे लक्ष देत नाहीत. मग सरळ दुसऱ्याच दिवशी आपण केस विंचरतो. या आपल्या वाईट सवयींमुळे केसांची चांगलीच वाट लागते. जर आपल्याला चांगले आणि सुंदर केस (Beautiful hair) हवे असतील तर आपण काही टिप्स फाॅलो करणे खूप जास्त महत्वाचे आहे. केसांची काळजी घेतली नाहीतर काही दिवसांमध्येच आपले केस खराब होण्यास सुरूवात होते.
रात्री झोपण्यापूर्वी केसांची मालिश नक्की करा!
जर तुम्ही दिवसभर केस विंचरले नाहीतर आपल्या केसांमध्ये गुंता हा मोठ्या प्रमाणात होतो. केसांमध्ये गुंता टाळण्यासाठी आपण नेहमीच आपल्या केसांना तेल लावायला हवे. तेल मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते. तसेच केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल लावू शकता आणि काही मिनिटांसाठी तुमच्या टाळूची मालिश करू शकता. नंतर आपले केस विंचरा. रात्री केसांना तेल लावल्याने केसांचे कूप मजबूत होतात. चमकदार आणि मुलायम केस मिळविण्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू करू शकता.
केस विंचरल्याशिवाय झोपणे टाळाच
शक्यतो रात्री झोपताना नेहमीच आपले केस विंचरून झोपा. केसांचे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही बेड किंवा उशीवर ठेवण्यापूर्वी तुमच्या डोक्याभोवती सुती कापड बांधू शकता. यामुळे केस गळत नाहीत आणि केस सैल होत नाहीत. जर तुम्ही तुमचे केस नियमितपणे धुत नसाल तर टाळूवरील छिद्र हळूहळू नाहीसे होतील. यामुळे टाळूचे नुकसान होते. त्यामुळे टाळू कमजोर होते. कोंडा, केस गळणे यासारख्या समस्याही निर्माण होतात. यामुळे दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर केसांना मसाज नक्की करा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)