Hair Care : केस धुताना ‘या’ खास टिप्स फाॅलो करा, वाचा याबद्दल अधिक !
केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी केस धुणे अत्यंत आवश्यक आहे. केस व्यवस्थित धुवून टाळूवर साचलेली घाण काढून टाकली जाते. साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुतले पाहिजे. मात्र, जर आपण योग्य प्रकारे केस धुतले नाही तर आपल्या केसांच्या समस्या वाढतात आणि केस गळती होण्याची शक्यता निर्माण होते.
मुंबई : केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी केस धुणे अत्यंत आवश्यक आहे. केस व्यवस्थित धुवून टाळूवर साचलेली घाण काढून टाकली जाते. साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुतले पाहिजे. मात्र, जर आपण योग्य प्रकारे केस धुतले नाही तर आपल्या केसांच्या समस्या वाढतात आणि केस गळती होण्याची शक्यता निर्माण होते. केस धुण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या. (Follow these special tips while washing your hair)
योग्य शॅम्पू निवडणे
केस स्वच्छ करण्यापूर्वी तुमच्या केसांच्या पोतनुसार कोणता शॅम्पू योग्य असेल हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. केसांच्या प्रकारानुसार बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत. बरेच लोक केसांवर कोणताही शैम्पू वापरतात. केसाच्या पोतनुसार शॅम्पू निवडणे फायदेशीर आहे.
पाण्यात शॅम्पू मिक्स करा
केसांवर थेट शॅम्पू लावण्याऐवजी पाण्यात मिक्स करून लावा. यानंतर, शॅम्पू असलेले पाणी थोडेसे डोक्यात ओता. शॅम्पूमधील रसायने पाण्यात टाकून ते कमी केले जातील. यानंतर, बोटांच्या मदतीने टाळूवर शॅम्पू व्यवस्थित लावा.
टॉवेलने केस पुसू नका
केसांमधून जास्तीचे पाणी काढून टाकल्यानंतर मायक्रो फायबर हेअर रेप वापरा. केस सुकविण्यासाठी थेट हेयर ड्रायर वापरू नका. जर आपले केस कोरडे दिसत असेल तर आपण सीरम वापरू शकता.
पूर्ण केस धुवा
केस धुण्याचा योग्य मार्ग म्हणजे संपूर्ण केसांना व्यवस्थित शॅम्पू लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपेल केस धुवा. कधीही थेट टाळूवर शॅम्पू लावू नका.
थंड पाण्याने केस धुवा
केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. थंड पाण्याने आणि हिवाळ्यात कोमट पाण्याने केस धुवा. केस धुतल्यानंतर, त्यांना कापसाच्या टॉवेलमध्ये थोडा वेळ बांधून ठेवा. ते कधीही घासून पुसू नका. घासणे आणि पुसणे केसांना उग्र बनवते.
केसातील गुंतागुंती कमी करा
सर्वप्रथम गुंतागुंती झालेल्या केसांची निगा राखा आणि केस कोरडे झाल्यावर केसांमधील गुता काढा. असे केल्याने गुंता काढताना आपले केस कमी प्रमाणात गळतील.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these special tips while washing your hair)