Hair Care Tips: ओले केस कधीही विंचरू नका, केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या!

आपण सर्वजण दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरतो. केस व्यवस्थित दिसण्यासाठी आणि स्टाइलिश दिसण्यासाठी आपण केस विंचरतो. परंतु जर योग्य प्रकारे केस विंचरले नाहीतर केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरावेत.

Hair Care Tips: ओले केस कधीही विंचरू नका, केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या!
केसांची काळजी
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 3:35 PM

मुंबई : आपण सर्वजण दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरतो. केस व्यवस्थित दिसण्यासाठी आणि स्टाइलिश दिसण्यासाठी आपण केस विंचरतो. परंतु जर योग्य प्रकारे केस विंचरले नाहीतर केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरावेत. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले होते. पण बहुतेक सौंदर्य तज्ञ सांगतात की, केस ओले असताना कधीही विंचरू नका. (Follow these tips after washing your hair)

ओले केस विंचरू नका

जेव्हा केस ओले असतात. तेव्हा ते कमकुवत होतात. यामुळे जेव्हा तुम्ही केल ओले असताना विचरतात तेंव्हा केस मुळापासून तुटतात. जर तुम्ही वारंवार ओले केस विंचरत असाल तर तुम्हाला केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. ओल्या केसांना विंचरल्याने केस कुरळे होण्याची देखील शक्यता असते. आपण नेहमी केस धुण्याच्या अगोदर केस विंचरले पाहिजेत.

केस विंचरण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

नेहमीच केस पूर्णपणे सुकल्याशिवाय विंचरू नका. केस पूर्णपणे कोरडे होऊद्या. केस धुतल्यानंतर सर्वप्रथम सीरम लावून त्यांना मऊ करा. त्यानंतर केस विचरा किंवा बोटांच्या मदतीने केसांमधील गाठी हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा. काही लोक फक्त केसांच्या वरच्या बाजूला कंगवा करतात. मात्र, तसे न करता आपले संपूर्ण केस विंचरा.

दररोज शॅम्पूने केस धुणे

अनेक जण फ्रेश राहण्यासाठी दररोज शॅम्पूने केस धुतात. मात्र दररोज शॅम्पूने केस धुणे तुम्हाला महागात पडू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज शॅम्पूने केस धुतल्याने केस खराब होतात. त्यामुळे एक किंवा दोन दिवसाआड केस धुवावेत.

केसांना तेल न लावणे

दररोज फ्रेश लूकसाठी अनेकजण केसांना तेल लावत नाही. त्यामुळे केस रुक्ष होतात. केस रुक्ष झाल्याने ते कंगव्याने नीट विंचरता येत नाही आणि केस तुटतात. नियमित केस तुटल्याने तुम्हाला हळूहळू टक्कल पडायला लागते. त्यामुळे नियमित तेल लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips after washing your hair)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.