Makeup Tips : नॅचरल मेकअपने सौंदर्य वाढवायचेय?; मग तर या टिप्स फाॅलो करा!
नॅचरल मेकअप किंवा कमीत कमी मेकअप प्रत्येक स्त्रीला आवडतो. कारण ज्यांना मेकअपची फारशी आवड नसते, त्यांना नॅचरल मेकअप आणि कमीत-कमी मेकअप आवडतो. यामुळेच आजकाल नॅचरल मेकअप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे तुमचा चेहरा अतिशय नॅचरल आणि पाहण्यास आकर्षक दिसतो.
मुंबई : नॅचरल मेकअप किंवा कमीत कमी मेकअप प्रत्येक स्त्रीला आवडतो. कारण ज्यांना मेकअपची फारशी आवड नसते, त्यांना नॅचरल मेकअप आणि कमीत-कमी मेकअप आवडतो. यामुळेच आजकाल नॅचरल मेकअप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे तुमचा चेहरा अतिशय नॅचरल आणि पाहण्यास आकर्षक दिसतो. पण नॅचरल मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण थोडीशी चूक तुमची सगळी मेहनत खराब करू शकते. कमीत कमी मेकअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घ्या. (Follow these tips for natural makeup)
1. जर तुम्हाला नॅचरल मेकअप दरम्यान तुमची त्वचा ताजी आणि चमकदार हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जर तुमची त्वचा निस्तेज असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी कोणतेही उत्पादन तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक आणू शकत नाही.
2. चेहरा नॅचरलरित्या चमकदार करण्यासाठी, सकाळी आणि संध्याकाळी चेहरा पूर्णपणे धुवा आणि मॉइश्चरायझर म्हणून, बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब गुलाब पाण्यात मिसळा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल चमक येईल. मेकअप केल्यानंतर ही चमक अधिक चांगली दिसेल.
3. नॅचरल मेकअपचा पहिला नियम म्हणजे तुम्हाला जड बेस तयार करण्याची गरज नाही. जर तुम्ही हेवी बेस तयार केले तर तुम्हाला नॅचरल मेकअप लुक मिळणार नाही. यासाठी हलके किंवा मध्यम कव्हरेज असलेले फाउंडेशन वापरा किंवा सीसी किंवा बीबी क्रीम वापरा.
4. जर तुम्हाला मॅट फिनिश लुक हवा असेल तर तुम्हाला मॅट मेकअप उत्पादने वापरावी लागतील. पण त्याचा जास्त वापर करू नका. नाहीतर चेहरा जड दिसेल. लुक नॅचरल बनवण्यासाठी अतिशय हलके पावडर वापरा.
5. डोळ्यांचा हैवी मेकअप कधीही करू नका, अन्यथा तुम्ही तुमचा लुक नॅचरल बनवू शकणार नाही. बोल्ड शेड्सऐवजी, हलके शेड्स निवडा. याशिवाय पापणीवर एकाच वेळी अनेक शेड्स लावणे टाळा. काजलच्या साहाय्याने टेललाइनिंग करा आणि मस्करासह काजळ लावा.
6. ब्लश अतिशय काळजीपूर्वक वापरा. जास्त ब्लश वापरल्याने तुमचा चेहऱ्यावर नॅचरल मेकअप दिसणार नाही. त्वचेचा टोन संतुलित करण्यासाठी काळजी घ्या. याशिवाय लिपस्टिक म्हणून मॅट आणि न्यूड शेड्स वापरा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips for natural makeup)