Skin Care : चमकदार निरोगी त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!
बदलत्या हवामानाचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमध्ये सतत घाम येतो. यामुळे मुरुमांची समस्या वाढते. अशा परिस्थितीत जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचा कोरडी ठेवणे खूप कठीण होते.
मुंबई : बदलत्या हवामानाचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमध्ये सतत घाम येतो. यामुळे मुरुमांची समस्या वाढते. अशा परिस्थितीत जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचा कोरडी ठेवणे खूप कठीण होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्या दूर करू शकता. (Follow these tips to get glowing healthy skin)
पाण्याने चेहरा धुवा
उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा आपला चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा थंड होते आणि ताजेपणाही येतो. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर चेहरा धुणे जास्त महत्वाचे आहे. कारण या हंगामात तुमची त्वचा अधिक चिकट दिसते. त्यामुळे चेहरा पाण्याने धुणे फार महत्वाचे आहे.
जास्त पाणी प्या
या काळात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चेहरा निर्जीव दिसतो. त्यामुळे या महिन्यात त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्यावे.
जास्त मॉइश्चरायझर लावू नका
बहुतेक लोकांना वाटते की मॉइश्चरायझर फक्त हिवाळ्यातच लावावे. पण हे चुकीचे आहे. हे त्वचेला हायड्रेट ठेवते तसेच पोषण देते. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही पाणी किंवा जेल आधारित मॉइश्चरायझर वापरू शकता. मात्र, जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावणे टाळाच.
सनस्क्रीन लावा
तज्ञांच्या मते, बहुतेक लोक घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावतात. त्याचा जास्त फायदा होत नाही. बाहेर पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी नेहमीच सनस्क्रीन लावावी. हे आपल्या त्वचेवर खोलवर कार्य करते. तसेच सूर्यापासून आपल्या त्वचेचे रक्षण करते.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Follow these tips to get glowing healthy skin)