Health Care : डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ मार्गांचा अवलंब करा!
डोकेदुखी हा शब्द जरी काढला तरी अनेकांचे डोके दुखण्यास सुरूवात होते. डब्ल्यूएचओच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आयुष्याच्या काही टप्प्यामध्ये डोकेदुखीचा अनुभव येतो. डोकेदुखीची सामान्य कारणे म्हणजे ताण, चिंता, भावनिक त्रास ही आहेत.
मुंबई : डोकेदुखी हा शब्द जरी काढला तरी अनेकांचे डोके दुखण्यास सुरूवात होते. डब्ल्यूएचओच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आयुष्याच्या काही टप्प्यामध्ये डोकेदुखीचा अनुभव येतो. डोकेदुखीची सामान्य कारणे म्हणजे ताण, चिंता, भावनिक त्रास, खाण्याच्या अनियमित सवयी, निर्जलीकरण, उच्च रक्तदाब, गरम हवामान असून शकतात. (Follow these tips to get rid of headaches)
प्राथमिक डोकेदुखीमध्ये मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि डोके आणि मानेच्या क्षेत्रातील स्नायूंवर ताण येतो. जो मेंदूतील रासायनिक क्रियाकलापांमध्ये बदल सह असू शकतात. मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि तणाव डोकेदुखी या प्रकारात येतात. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत.
अरोमाथेरपी
अरोमाथेरपी ही एक डोकेदुखी दूरसाठी चांगली थेरपी आहे. पण, ही प्रक्रिया केवळ मूड बदलण्यासाठी वापरली जात नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की तणाव, चिंता आणि मायग्रेनवर उपचार करण्यासाठी ही थेरपी वापरली जाऊ शकते.
योगा
जगात क्वचितच असा कोणताही रोग आहे. ज्यावर योगाद्वारे उपचार केले जात नाहीत. होय, इतर आरोग्य समस्यांप्रमाणे योगा तुमच्या डोकेदुखीवर देखील उपचार करू शकतो. सेतू बंधनासन (ब्रिज पोझ), शिशुआसन (मुलांचे पोझ), हस्तपदसन (स्टँडिंग फॉरवर्ड बेंड) असे बरेच आसन केल्याने देखील आपली डोकेदुखी दूर होऊ शकते.
स्मार्टफोन
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संशोधक म्हणतात की, नियमित डोकेदुखी आणि मायग्रेनने ग्रस्त लोकांनी स्मार्टफोनचा वापर कमीत-कमी करावा. न्यूरोलॉजी: क्लिनिकल प्रॅक्टिस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे सुचवले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करतात. त्यांना मायग्रेन होण्याची शक्यता असते.
झोपेचा अभाव
डोकेदुखीचे मुख्य कारण बऱ्याच वेळा आपली झोप देखील असते. एवढेच नाही तर इतर अनेक समस्या जसे चिंता, नैराश्य, थकवा यामुळे देखील डोकेदुखीची समस्या वाढण्याची शक्यता असते. आपले आरोग्य सुधारण्यासाठी दररोज 6-7 तासांची योग्य झोप घ्या. प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे गंभीर आजार उद्भवू शकतात. एवढेच नाही, पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामुळे आपल्याला जर निरोगी आयुष्य जगाचे असेल तर आपण किमान 7 ते 8 झोप ही घेतलीच पाहिजे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips to get rid of headaches)