Nail care : मजबूत आणि सुंदर नखे मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!
प्रत्येक मुलीला सुंदर आणि मजबूत नखे हवी असतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे नखांची काळजी घेणे कठीण आहे. अलिकडच्या काळात नखांची देखभाल आणि स्टाईल करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. मुली अनेकदा तक्रार करतात की त्यांची नखे वाढत नाहीत आणि लवकर तुटतात.
मुंबई : प्रत्येक मुलीला सुंदर आणि मजबूत नखे हवी असतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे नखांची काळजी घेणे कठीण आहे. अलिकडच्या काळात नखांची देखभाल आणि स्टाईल करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. मुली अनेकदा तक्रार करतात की त्यांची नखे वाढत नाहीत आणि लवकर तुटतात. जर तुमची पण नखे खूप लवकर तुटत असतील तर काळजी करू नका. नखे मजबूत करण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
नखे मजबूत ठेवण्यासाठी टिप्स
1. हात स्वच्छ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. आपले हात स्वच्छ करताना, हलके घासून घ्या जेणेकरून त्वचेची मृत त्वचा काढून टाकली जाईल. ज्यामुळे नखांची त्वचा मऊ होते.
2. हातांना तेल लावणे हा एक व्यायाम आहे. जो तुम्ही मोकळ्या वेळेत कधीही करू शकता. तुम्ही बदाम, जर्दाळू किंवा इतर कोणतेही तेल वापरून क्युटिकल्सची मालिश करू शकता.
3. नखांना नेहमी क्लिपिंग करा. यामुळे तुमचे नखे मजबूत होतात, तसेच ते स्वच्छ आणि निरोगी दिसतात.
4. नैसर्गिक पद्धतीने तुमचे नखे सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बायोटिन वापरू शकता. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक पोषक घटक असतात. मात्र, कोणत्याही प्रकारचे बायोटिन वापरण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5. हायड्रेशन आवश्यक आहे. केसांपासून नखांपर्यंत त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे.
6. आठवड्यातून एकदा मॅनीक्योर आणि पेडीक्योर करा.
हे करणे टाळाच
1. नखांना नेहमी काहीतरी लावलेले ठेवा. जर तुम्हाला नेल पॉलिश लावणे आवडत नसेल तर तुम्ही पारदर्शक पॉलिश वापरू शकता. असे केल्याने नखे मजबूत राहतात.
2. जर तुम्हाला नखे चावण्याची सवय असेल आणि त्यापासून मुक्त व्हायचे असेल तर जेल नेल पॉलिश वापरा. जेल नेल पॉलिश नखे निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच नखे चावणे प्रतिबंधित करते.
लसूणची पेस्ट
लसूण पेस्ट बनवा आणि ती नखांवर नियमितपणे लावा. सोबतच लसणीचे सेवन देखील वाढवा. जर दररोज लसून पेस्ट नखांना लावणे जमत नसेल तर, आठवड्यातून किमान दोन दिवस हा उपाय करावे. यामुळे नखांना मजबुती मिळेल.
मोहरीच्या तेलानी मसाज
जर तुम्ही नखांची पुरेशी काळजी घेऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने किमान 15 मिनिटे नखांची मालिश करा. यामुळे आपले नखे चमकदार होतील आणि वेगाने वाढू लागतील.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Follow these tips to get strong and beautiful nails)