Skin care : रोज रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीनचे पालन करा, काही दिवसात चेहऱ्याचा रंग उजळेल!
निरोगी आणि स्वच्छ त्वचा (Clean Skin) कोणाला आवडत नाही? मेकअप, सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव, प्रदूषण, चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे यासारख्या वाईट सवयींमुळे त्वचेची (Skin) चमक नाहीशी होते. यामुळे त्वचा कोमेजलेली दिसते.
मुंबई : निरोगी आणि स्वच्छ त्वचा (Clean Skin) कोणाला आवडत नाही? मेकअप, सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव, प्रदूषण, चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे यासारख्या वाईट सवयींमुळे त्वचेची (Skin) चमक नाहीशी होते. यामुळे त्वचा कोमेजलेली दिसते. तुमचाही त्वचेचा टोन हरवला असेल आणि तुम्हाला तो परत मिळवायचा असेल, तर रोज रात्री झोपताना त्वचेची काळजी (Care) घ्या. रात्री आपली त्वचा स्वत: ची दुरुस्ती करण्याचे काम करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची निगा राखा आणि काही दिवसात तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलेल.
चेहरा धुवा
रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केली पाहिजे. तुम्ही आॅफिसला जात असाल, तर तुम्ही घरी परतल्यावर लगेचच तुमचा मेकअप काढा. यानंतर, आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपली त्वचा धुवावी. यामुळे तुमच्या त्वचेतील अशुद्धता निघून जाते. त्यामुळे आजपासून दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा थंड पाण्याने स्वच्छ करा.
मॉइश्चरायझिंग
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे फार महत्वाचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर क्रीम, लोशन किंवा खोबरेल तेल वापरा. यामुळे तुमचा कोरडेपणा दूर होईल, तसेच त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.
फेस मास्क वापरा
काही वेळा त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळेही चमक नाहीशी होते. अशावेळी आपण वेळोवेळी त्वचेवर फेस मास्क वापरला पाहिजे. उन्हाळ्यात चंदन आणि मुलतानी मातीचा मास्क खूप चांगले असतात. काकडीचा मास्क देखील वापरता येतो.
केसांची मालिश
त्वचेसोबतच केसांची काळजी घेणेही खूप गरजेचं आहे. केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केसांना वेळोवेळी मसाज करणे खूप गरजेचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस केसांना मसाज करा.
संबंधित बातम्या :
Healthy Foods : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!
मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!