कोरड्या त्वचेवर लावा ‘हे’ 5 होममेड मास्क, देतील जबरदस्त परिणाम

कोरडेपणापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठीघरीच काही नैसर्गिक फेस मास्क बनवू शकता. हे पाच आयुर्वेदिक मास्क तुम्हाला या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यास मदत करतील.

कोरड्या त्वचेवर लावा 'हे' 5 होममेड मास्क, देतील जबरदस्त परिणाम
skin Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 7:09 PM

हिवाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्वचेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण थंडीत आपली त्वचा भरपुर प्रमाणात कोरडी पडते. कोरडेपणापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बऱ्याचदा काहीजण बाजारात आढळणाऱ्या प्रॉडक्ट्सचे वापर करतात. तुम्हाला जर हे प्रॉडक्ट विकत घेऊन तुमचे पैसे वाया घालवायचे नसतील तर या ऋतूत आपल्या त्वचेवरील हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी तुम्ही घरीच काही नैसर्गिक फेस मास्क बनवू शकता. हे पाच आयुर्वेदिक मास्क तुम्हाला या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यास मदत करतील.

कडुलिंबाच्या पानाचा फेस पॅक

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचेच्या संसर्गापासून बचाव करतात आणि पोषण देण्यास मदत करते. यात अँटीसेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील आहेत जे केवळ त्वचा चमकदार बनवत नाहीत तर चट्टे, मुरुम आणि सुरकुत्यांचा प्रभाव देखील कमी करून टाकतात. कडुलिंबाचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. कडुलिंबाची पाने बारीक वाटून त्यात गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावू शकता.

तुळशीच्या पानांचा फेस पॅक

तुळशीचे झाड जवळजवळ प्रत्येकाच्या घरात आढळते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-एजिंग आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात जे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात. हा मास्क बनवण्यासाठी तुळशीची पाने बारीक करून त्यात थोडे गुलाबपाणी आणि हळद घालावे. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुखू द्या, ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने साफ करा. यामुळे त्वचा हायड्रेट होईल आणि मऊ देखील होईल.

हळद चंदनाचा मास्क

तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असल्यास तुम्ही हळद आणि चंदनाचा फेस मास्क तयार करून चेहऱ्यावर लावा, हळद आणि चंदन मापात घेऊन मिक्स करा. या पेस्ट मध्ये तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. हि पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावून काही मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. कारण यातील चंदन त्वचेला हायड्रेट करते आणि मुरुमांना येण्यास रोखण्यास देखील मदत करते. दुसरीकडे,हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे चेहरा चमकदार बनवतात.

कोरफड आणि गुलाबजल मास्क

थंडीमुळे तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही कोरफड आणि गुलाबपाणी वापरून फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावू शकता. कारण कोरफड कोरडी त्वचा हायड्रेटेड ठेवते. हिवाळ्यात कोरफड आणि गुलाबपाण्याने तयार केलेलं फेस मास्क वापरल्यास सनबर्न कमी होण्यास मदत होते. या मास्कमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील आहेत. जी त्वचा मुलायम ठेवते.

मध आणि लिंबाचा मास्क

लिंबू तुमच्या त्वचेची चमक परत आणण्यास मदत करते आणि चेहरा चमकदार बनवते. चांगल्या परिणामांसाठी लिंबू आणि मध यात गुलाबपाणी वापरून मास्क तयार करा. तयार केलेला फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे त्वचेच्या मृत पेशी काढून त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.