चेहरा उजळण्यासाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय
या लेखात, चमकदार त्वचेसाठी घरगुती फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. गव्हाचे पीठ, हळद, मध आणि गुलाबपाणी या नैसर्गिक घटकांपासून बनवलेला हा फेसपॅक त्वचेला चमक आणि ओलावा प्रदान करतो. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचेतील निरोगीपणा वाढतो आणि चेहरा उजळतो. कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे हा पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.
प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा चमकदार व्हावी अशी इच्छा असते त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करत असतात. फक्त त्यासाठी आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी आज बाजारात अनेक प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळं प्रत्येकाच्या त्वचेला फायदा होईलच असे नाही. कारण आपल्याला माहित आहे कि, प्रत्येकाची त्वचा हि वेगवेगळी असते.
अलीकडेच आपण पहिले तर आता अनेक महिला या नैसर्गिकरित्या घरगुती उपाय करत आहेत. कारण घरगुती उपचारामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत. नैसर्गिक गोष्टींमधून मिळणारे सौंदर्य हे सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते, कारण सौंदर्याचा खरा खजिना निसर्गातच दडलेला असतो.
सध्या महिला सौंदर्याच्या बाबत अत्यंत सजग झाल्या आहेत. केमिकल्समुळे चेहऱ्यावर परिणाम होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या केमिकल्स प्रोडक्टचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होत असल्याचंही त्यांना माहीत आहेत. त्यामुळेच त्या नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर देताना दिसत आहेत. चेहऱ्यावर काहीच परिणाम होऊ नये म्हणून त्या या गोष्टींवर भर देताना दिसत आहेत. नैसर्गिक गोष्टीतून सौंदर्य खुलतं. ते सर्वाधिक शुद्ध आणि प्रभावशाली असतं असं या महिलांना वाटतं. त्यामुळेच कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्याऐवजी नैसर्गिकरित्या सौंदर्य राखण्यावर महिलांचा भर असतो. चेहऱ्यावरील त्वचा गोरी करण्यासाठी जाणून घेउयात या सोप्या टिप्सबद्दल.
हा फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन चमचे गव्हाचे पीठ
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा मध
दोन चमचे गुलाबपाणी
फेस पॅक बनवण्याची पद्धत
हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या वाटीत पीठ, हळद, मध आणि गुलाबपाणी हे सर्व घटक निर्धारित प्रमाणात मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि नंतर या पेस्टमध्ये थोडा आणखीन मध घेऊन छान मिक्स करा. कारण मध तुमच्या चेहऱ्यावरील त्वचावर चमक आणि ओलावा देखील प्रदान करते.
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा हा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दरम्यान जर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावला तर तुम्हाला चेहऱ्यावरील फरक जाणवू लागेल. आणि काही दिवसातच तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा उजळ होईल.