Holi 2022 : होळी खेळल्यानंतर रंग लगेच कसे घालवायचे? ‘हे’ घरगुती उपाय करुन पहा

होळीनंतर (Holi) दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण (Holi Colours) करायला सर्वांना आवडतं. पण यानंतर चेहऱ्यावर, केसाला लागलेला रंग काढण्यात फार त्रास सहन करावा लागतो. बाजारातील केमिकलयुक्त रंग चेहऱ्यावरुन निघता निघत नाही.

Holi 2022 : होळी खेळल्यानंतर रंग लगेच कसे घालवायचे? 'हे' घरगुती उपाय करुन पहा
Holi coloursImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 4:15 PM

होळीनंतर (Holi) दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण (Holi Colours) करायला सर्वांना आवडतं. पण यानंतर चेहऱ्यावर, केसाला लागलेला रंग काढण्यात फार त्रास सहन करावा लागतो. बाजारातील केमिकलयुक्त रंग चेहऱ्यावरुन निघता निघत नाही. यामुळे चेहरा आणि केसावरील रंग काढण्यासाठी तासनतास शॅम्पू आणि साबण चेहऱ्यावर लावून चेहरा घासावा लागतो. अनेकदा त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते तर केमिकलयुक्त रंगांमुळे केस गळण्याचीही समस्या होऊ शकते. म्हणूनच या रंगांसोबत खेळताना बरीच काळजी घ्यावी लागते. रंगांसोबत खेळून झाल्यानंतर काही उपाय करण्यापेक्षा खेळ सुरु करण्यापूर्वीच काही घरगुती उपाय केले तर होळीचा रंग लगेच घालवता येऊ शकतो. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात..

सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर वापरा

इतर दिवसांप्रमाणेच होळी खेळण्यापूर्वीही सनस्क्रीन वापरा. बाहेर जाऊन उन्हात होळी खेळण्याआधी त्वचेवर सनस्क्रीन क्रीम लावणं गरजेचं आहे. हे तुमच्या त्वचेला हानिकारक UV किरणांपासून वाचवतं. सनस्क्रीनमुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज्ड राहण्यात मदत होते.

बर्फ वापरा

होळीच्या दिवशी बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर बर्फ लावू शकता. बर्फामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाच्या तुकड्याने हलक्या हाताने 10 मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या छिद्रात रंग अडकून राहणार नाही.

तेल लावा

बाहेर जाण्यापूर्वी आणि होळी खेळण्यापूर्वी त्वचेला तेल लावा. तेलामुळे नंतर तुम्ही रंग सहज काढू शकाल. त्वचेसाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल किंवा एरंडेल तेल वापरू शकता.

नखांना नेलपेंट लावा.

नखांवरील होळीचा रंग काढणं खूप कठीण काम असतं. जवळपास आठवडाभर हे रंग नखांवर राहतात. यासाठी सोपा उपाय म्हणजे नेलपेंट लावणे. यामुळे तुमची नखं स्वच्छ आणि सुरक्षित राहतील.

तोकडे कपडे परिधान करू नका

होळी खेळायला बाहेर पडण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे झाकणारे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला जेणेकरून त्वचेला रंग कमी लागेल.

हेही वाचा:

होळीसाठी बनवा नैसर्गिक रंग घरच्या घरी, ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही तर फायदेच होतील…

जाणून घ्या होळीसाठी हर्बल रंग का आहेत आवश्यक?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.