चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रस्त आहात? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

सुंदर आणि चमकदार केस आपल्या साैंदर्यामध्ये भर घालतात. चांगले आणि सुंदर केस मिळवण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न देखील करतात.

चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रस्त आहात? मग, 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
चेहऱ्यावरील नको असलेले केस
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 5:40 PM

मुंबई : सुंदर आणि चमकदार केस आपल्या साैंदर्यामध्ये भर घालतात. चांगले आणि सुंदर केस मिळवण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न देखील करतात. मात्र, हेच केस जेंव्हा चेहऱ्यावर येतात, तेंव्हा केस नको नको वाटतात. कारण चेहऱ्यावर केस यायला लागल्याने आपले साैंदर्य कमी होण्यास सुरूवात होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय देखील करतात. (Home remedies to remove unwanted facial hair)

तरीही चेहऱ्यावरील केसांची समस्या दूर होते नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण एक खास पेस्ट घरी तयार करू शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील केस जाण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला मध, हळद आणि मोहरीचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर हे सर्व घटक मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आले आहेत तेथेच फक्त ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा पूर्ण पेस्ट निघून गेल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय आपण सतत आठ दिवस केला तर आपल्या चेहऱ्यावरील नको असलेले केस निघून जाण्यास मदत होते. दोन चमचे गुलाब पाणी, दोन चमचे नारळाचे तेल, बेसन पीठ एकत्रित घेऊन पेस्ट तयार करा. यानंतर एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा.

पेस्ट तयार झाल्यानंतर नको असलेल्या केसांवर लावा आणि 30 मिनिटांनंतर हळूवार रगडून ही पेस्ट काढावी. सलग सात दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. यानंतर कापसाच्या मदतीने आपण त्वचेवर गुलाब पाणी लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर जास्त स्वरुपात केस असल्यास नियमित या पेस्टचा उपयोग करावा. यासह आपण चेहऱ्यावर तांदळाच्या पिठाचा लेप देखील लावू शकता. तांदळाच्या पिठामुळे त्वचेवरील अनावश्यक केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Home remedies to remove unwanted facial hair)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.