Skin Care : मध आणि साखरेचा स्क्रब चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यकर्मांमध्ये स्क्रब करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्क्रबिंगशिवाय आपण आपल्या त्वचेवरील साठेलेल प्रदूषण, धूळ कण आणि मृत त्वचा काढून टाकू शकत नाही.
मुंबई : त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यकर्मांमध्ये स्क्रब करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्क्रबिंगशिवाय आपण आपल्या त्वचेवरील साठेलेल प्रदूषण, धूळ कण आणि मृत त्वचा काढून टाकू शकत नाही. यानंतरच आपण आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग केली पाहिजे. त्याच प्रकारे आपण स्क्रबद्वारे आपल्या त्वचेमध्ये नवीन तजे आणू शकता. (Honey and sugar scrub are beneficial for the skin)
जर आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर आपण त्वचेला मध आणि साखरेचा स्क्रब लावला पाहिजे. हा स्क्रब घरी तयार करण्यासाठी आपल्याला तीन चमके मध आणि दोन चमचे साखर लागणार आहे. स्क्रब तयार करण्यासाठी साखर आणि मध मिक्स करा आणि लगेचच चेहऱ्याला लावा. त्यानंतर गोलाकार करून चेहऱ्याची मालिश करा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटे आपल्या चेहऱ्याला राहूद्या. त्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
सुंदर आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण घरच्या घरी स्क्रब तयार केला पाहिजे. साखर, टोमॅटो आणि गुलाब पाण्याचा स्क्रब चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा स्क्रब घरच्या घरी तयार करण्यासाठी तीन चमचे साखर, अर्धे टोमॅटो आणि गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम टोमॅटो आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करा त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करा आणि लगेचच चेहऱ्याला लावा. यावेळी साखर या पेस्टमध्ये विरघळणार नाही, याची काळजी घ्या.
अक्रोड, आवळा, मध सर्वात अगोदर अक्रोड बारीक करून घ्या. मात्र खूप जास्त बारीक करू नका कारण स्क्रबसाठी ग्रॅन्यूल आवश्यक आहेत. एक चमचा मध घ्या आणि आवळा बारीक करून आता हे सर्व मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात हे मिश्रण घ्या आणि स्क्रब करा. कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपला चेहरा स्क्रब करा आणि स्क्रबिंगनंतर 2 मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Honey and sugar scrub are beneficial for the skin)