Hair Care Tips : दोन तोंडी केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क नक्की वापरा!
घाण, कडक सूर्यप्रकाश, रसायनांचा जास्त वापर आणि केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेक वेळा केस खालच्या बाजूने दोन तोंडी केस तयार होतात. दोन तोंडी केस केवळ वाईट दिसत नाहीत, तर ते तुमचे केस खराब करतात. यासोबतच केसांची वाढ थांबते आणि केस तुटू लागतात.
मुंबई : घाण, कडक सूर्यप्रकाश, रसायनांचा जास्त वापर आणि केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेक वेळा केस खालच्या बाजूने दोन तोंडी केस तयार होतात. दोन तोंडी केस केवळ वाईट दिसत नाहीत, तर ते तुमचे केस खराब करतात. यासोबतच केसांची वाढ थांबते आणि केस तुटू लागतात. दोन तोंडी केसांची समस्या दूर करण्यासाठी बरेच लोक अनेक उत्पादने वापरतात. मात्र, तरीही ही समस्या कमी होत नाही. ही समस्या कमी करायची असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (How to remove problem of split hair permanently know about 4 natural hair mask)
कोरफड आणि एरंडेल तेल
कोरफड आणि एरंडेल तेलाचा मास्क दोन तोंडी केसांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही तीन ते चार चमचे कोरफड जेल घ्या. त्यात दोन चमचे एरंडेल तेल घालून चांगले मिक्स करा. चांगले मिसळल्यानंतर, ही पेस्ट टाळूमध्ये आणि केसांच्या टोकांवर लावा. सुमारे एक तास सोडा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने दोन तोंडी केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.
दूध आणि मध
दूध आणि मध बनवलेले हेअर मास्क देखील खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला थोडे दूध, एक अंडे आणि दोन चमचे मध लागेल. एका भांड्यात थोडे दूध घाला, त्यात अंड्यातील पिवळ बलक आणि दोन चमचे मध घाला. या गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर केसांना चांगले लावा आणि 20 मिनिटे सोडा. यानंतर डोके सौम्य शैम्पूने धुवा. काही दिवसात फरक जाणवेल.
केळी आणि दही
केळाचा मास्क आपल्या केसांसाठी अत्यंत चांगला आहे. यासाठी एक केळे घ्या आणि ते चांगले मॅश करा. यानंतर एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळा. हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. जर केस लांब असतील तर दोन केळी मॅश करा आणि त्यात दोन चमचे दही आणि मध घाला. केसांवर सुमारे एक तास सोडा. यानंतर डोके सौम्य शैम्पूने धुवा.
आर्गन तेल बहुगुण संपन्न
अनेक गुणांनी संपन्न तेल – केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही अर्गान तेल वापरू शकता. आर्गन ऑइलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, स्क्लेलीन, ऑलेइक अॅसिड, लिनोलिक अॅसिड, पॉलीफेनॉल इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. हे केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. आर्गन तेलाचं हेअर कंडीशनरही फार उपयोगी असते. केसांचा गुंता सोडवून ते चमकदार करण्यासाठी हे कंडीशनर फार उपयोगी ठरते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(How to remove problem of split hair permanently know about 4 natural hair mask)