Health Tips | त्वचेशी संबंधित समस्यांवर ‘आईस क्यूब्स’ ठरेल परिणामकारक

‘आईस क्यूब्स’ म्हणजेच बर्फाच्या तुकड्यांचा वापर केवळ विविध पेयांमध्ये नाही तर त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठीही केला जाउ शकतो. ‘आईस क्यूब्स’च्या माध्यमातून चेहरा अधिक चमकदार होउन, लालसरपणा, जळजळ, पुरळ आदी समस्यादेखील कमी होण्यास मदत होउ शकते.

Health Tips | त्वचेशी संबंधित समस्यांवर ‘आईस क्यूब्स’ ठरेल परिणामकारक
ice cubes for faceImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 3:07 PM

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये तापमानाचा पारादेखील चढा असतो. उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या (Skin Problem) निर्माण होत असतात. त्यामुळे गर्मीच्या दिवसांमध्ये त्वचेसह संपूर्ण शरीराचीही काळजी घेणे आवश्‍यक असते. उन्हाळ्यात अनेक शहारांचा पारा 40 अंशावर गेला आहे. गर्मीमुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडत असतो. घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय सूर्यातून निघणार्या अतिनील किरणांमुळे (UV rays) त्वचेचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण अनेक प्रकारे घरगुती उपाय योजना करीत असतो. दरम्यान, आईस क्यूब्स (Ice Cubes) म्हणजेच बर्फांच्या तुकड्यांव्दारेदेखील तुम्ही तुमच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्या चुटकीसरशी दूर करु शकतात. आईस क्यूब्सच्या माध्यमातून पुरळ, त्वचेवरील लालसरपणा, डोळ्यांची सूज आदी विविध समस्या कमी होण्यास मदत होत असते. या लेखात आईस क्यूब्सच्या वापराच्या पध्दती जाणून घेणार आहोत…

पुरळांपासून सुटका

आईस क्यूब्समध्ये दाहविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होत असते. या शिवाय पुरळांपासूनही सुटका होते. एखाद्या भागाला सुज आली असल्यास बर्फाने ती कमी होते.

चमकदार त्वचा

आईस क्यूब्समुळे त्वचेवर चमक निर्माण होत असते. चेहर्यावर बर्फ लावल्यावर रक्तप्रवाहदेखील उत्तम राहतो. त्यामुळे त्वचेवर चमक निर्माण होत असते.

डोळ्यांची सूज कमी होते

बर्फात कुठल्याही प्रकारची सूज कमी करण्याची क्षमता असते. अनेकदा आपल्याला काही मार लागल्यास आपण त्यावर बर्फ चोळत असतो. तसेच सुई टोचल्यावरही अनेकदा त्यावर बर्फ चोळून सुज कमी करण्याचा सल्ला दिला जात असतो.

काळे सर्कल होतात दूर

अनेकांच्या डोळ्यांखाली काळे वर्तुळ निर्माण झालेली असतात. आईस क्यूबच्या माध्यमातून ही काळी वर्तुळं हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. अनेकदा यातून वाढत्या वयाचे संकेतदेखील मिळत असतात. परंतु बर्फाच्या माध्यमातून ही लक्षणे कमी करता येतात.

खाजेवर नियंत्रण

अनेकदा जास्त उन्हात फिरल्याने त्वचेला लालसरपणा येतो तसेच तीव्र खाजदेखील सुटत असते. परंतु त्यावर आईस क्यूबचा वापर केल्या खाज कमी होते व त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

त्वचेची छिद्रे साफ होतात

बर्फ मुळात एक एक्सफोलिएटर आहे. दूधात बर्फाचे तुकडे टाकून त्वचेवर लावल्यास मृत पेशी साफ होतात. तसेच त्वचेच्या छिद्रांची सफाई होते. त्यामुळे चेहरा चमकदार होत असतो.

दीर्घकाळ मेकअप टिकतो

उन्हाळ्यात येत असलेल्या घामामुळे अनेकदा मेकअप खराब होण्याच्या तक्रारी येत असतात. परंतु जर मेकअप करण्याआधी चेहर्यावर बर्फ लावल्यास मेकअप दीर्घ काळापर्यंत टिकण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

Zodiac | सावधान ! मंगळ करणार शनीच्या राशीत प्रवेश, या 4 राशींच्या लोकांना द्यावे लागणार अडचणींना तोंड

मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडून आता विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे धडे; पहिल्या टप्प्यत 100 शिक्षकांना प्रशिक्षण

Whatsapp Features 2022: व्हॉईस मेसेज अधिक मजेदार बनवण्यासाठी व्हॉट्सॲप नवीन फीचर्स आणणार, जाणून घ्या खासियत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.