Hair | केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आहारात या खास आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा

सोयाबीनचे सेवन आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यात स्पर्मिडीन नावाचे पोषक तत्व देखील असते, हे घटक केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसांचे नैसर्गिक सौंदर्य मिळते. यामुळे जर आपल्याला पांढऱ्या केसांची समस्या दूर करायची असेल तर आपण आपल्याला दररोजच्या आहारामध्ये सोयाबीनचा नक्कीच समावेश करायला हवा.

Hair | केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आहारात या खास आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:20 PM

मुंबई : पांढऱ्या केसांची (Hair) समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकजण पांढरे केस दिसू नयेत, यामुळे विविध केमिकलयुक्त गोष्टींचा वापर करतात. हेच कारण आहे की, पांढऱ्या केसांची समस्या अधिकच गंभीर होते. केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली खराब जीवनशैली (Lifestyle) हे आहे. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपण सकस आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच आपण मेहंदीमध्ये आवळा वगैरे मिक्स करून जर केसांना लावले तरीही ते फायदेशीर (Beneficial) ठरते. मात्र, सकस आहारावर अधिक भर द्या. जीवनशैली इतकी जास्त खराब झाली आहे की, बऱ्याच वेळा लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात. मात्र, लहान मुलांच्या केसांना काहीही न लावता त्यांना सकस आहार द्या.

सोयाबीन

सोयाबीनचे सेवन आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यात स्पर्मिडीन नावाचे पोषक तत्व देखील असते, हे घटक केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसांचे नैसर्गिक सौंदर्य मिळते. यामुळे जर आपल्याला पांढऱ्या केसांची समस्या दूर करायची असेल तर आपण आपल्याला दररोजच्या आहारामध्ये सोयाबीनचा नक्कीच समावेश करायला हवा.

हे सुद्धा वाचा

डाळी

शरीरासाठी आणि सुंदर केस मिळवण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये डाळींचा समावेश करा. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, जस्त आणि लोह देखील असते, जे केसांसाठी फायदेशीर ठरते. केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी डाळींचा आहारात समावेश करायला हवा. डाली केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात. डाळींचे आपण अनेक प्रकारे सेवन करू शकतो. वरण आणि विविध भाज्यांमध्ये डाळी मिक्स करून खा.

आवळा

आवळा आपल्या केसांसाठी अत्यंत गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याचे काम करते, केस गळणे थांबवते. इतकेच नाहीतर आवळा केस पांढरे होण्यापासूनही वाचवते. पांढरे केस होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही दररोज एका आवळ्याचे सेवन करू शकता. दोन आवळे घ्या आणि दोन चमचे खोबरेल तेल घ्या. तेल कोमट करून त्यामध्ये आवळे मिक्स करा. हे तेल केसांना लावल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. (वरील टिप्स सामान्य ज्ञानांवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.