Hair Care : जाड आणि मजबूत केस मिळवण्यासाठी आहारात ‘या’ 7 गोष्टींचा समावेश करा!

प्रत्येकाला सुंदर आणि जाड केस हवे असतात. असे म्हटले जाते की आपण जे खातो ते आपल्या आरोग्यावर तसेच केस आणि त्वचेवर परिणाम करते. जेवणात पौष्टिक अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते. तसेच आजारांपासून दूर राहता येते. त्याचप्रमाणे केसांना निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वे आवश्यक असतात.

Hair Care : जाड आणि मजबूत केस मिळवण्यासाठी आहारात 'या' 7 गोष्टींचा समावेश करा!
केस
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 8:03 AM

मुंबई : प्रत्येकाला सुंदर आणि जाड केस हवे असतात. असे म्हटले जाते की आपण जे खातो ते आपल्या आरोग्यावर तसेच केस आणि त्वचेवर परिणाम करते. जेवणात पौष्टिक अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते. तसेच आजारांपासून दूर राहता येते. त्याचप्रमाणे केसांना निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वे आवश्यक असतात. आहारात निरोगी गोष्टींचे सेवन केल्याने केस गळणे, दोन तोंडी केस इत्यादी समस्या कमी होतात. त्यात असलेले पोषक घटक टाळूचे पोषण करण्याचे काम करतात. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील पूर्ण करते.

1. पालक

पालकमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जर तुम्ही त्याचा नियमित आहारात वापर केला तर ते तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, लोह, बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. जे केसांना निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

2. सॅल्मन

सॅल्मनमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड भरपूर असते. सॅल्मन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, हे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् टाळूला पोषण देते. जर तुम्ही नियमितपणे सॅल्मन खाल तर केस गळणे कमी होते.

3. ग्रीक दही

आरोग्याबरोबरच ग्रीक दही केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे तुमच्या केसांचा पोत निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात. ग्रीक दहीमध्ये व्हिटॅमिन बी 5 असते. जे केस गळण्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

4. पेरू

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. आपण हेअर मास्क म्हणून वापरू शकता. पेरूच्या पानांचा हेअर मास्क केसांसाठी खूप चांगला आहे.

5. रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते. एक अँटी-ऑक्सिडंट घटक जो सेबमचे उत्पादन कमी करण्यास मदत करतो. हे आरोग्यासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

6. सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. सूर्यफुलाचे बी केस लांब आणि रेशमी ठेवण्यास मदत करते.

7. शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत करते. याशिवाय, हे लोहाचे प्रमाण वाढवण्यास देखील मदत करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 7 things in your diet to get thick and strong hair)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.