Hair Care Tips : केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा ‘हे’ उपाय

केसांच्या स्कल्पमध्ये पिगमेंट सेल्स असतात, या सेल्समुळे केसांना रंग प्राप्त होत असतो. ज्यावेळी या सेल्स मरतात, त्यावेळी केसांना पांढरा रंग प्राप्त होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात.

Hair Care Tips : केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा 'हे' उपाय
केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 9:39 AM

मुंबई : प्रत्येक जण आपण सुंदर कसे दिसू, याकडे विशेष लक्ष देत असतो. या सौदर्यामध्ये केवळ चेहऱ्याचाच नव्हे, तर केसही चमकदार, काळे कसे दिसतील हे पाहिले जाते. मात्र केस पांढरे होण्याची समस्या अनेकांच्या सुंदर दिसण्यामध्ये आड येत असते. चुकीची जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत होत असलेला निष्काळजीपणा याचा आपल्या केसांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम दिसून येतो. आपले केस पांढरे होण्यास या गोष्टी कारणीभूत ठरतात. तणाव आणि कमी आहार यामुळेदेखील आपले केस पांढरे होतात. तुम्हाला पहिल्यांदा पांढरा केस दिसला तर घाबरून जाण्याची गरज नाही. (Is the hair turning white, Then do the this solution quickly)

केसांच्या स्कल्पमध्ये पिगमेंट सेल्स असतात, या सेल्समुळे केसांना रंग प्राप्त होत असतो. ज्यावेळी या सेल्स मरतात, त्यावेळी केसांना पांढरा रंग प्राप्त होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. शाम्पूचा अधिक प्रमाणात वापर, तेलाचा कमी प्रमाणात वापर कारणे आणि आहारातून पोषक तत्वे कमी मिळणे, ही पांढर्‍या केसांमागील कारणे ठरू शकतात. पांढऱ्या रंगाच्या केसांपासून सुटका करून घेण्यासाठी कोणताही विशेष उपाय नाही.

केस कापू नका

जर तुमचे केस अपेक्षित वेळेआधी पांढरे झाले असतील तर चिंता करू नका. मात्र तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागेल. केस पांढरे झालेत म्हणून केस कापण्याची चूक करू नका. त्यामुळे तुम्हाला पांढरे केस लपवणे कठीण होईल. केस जर मोठे असतील, तर त्यात तुमचे पांढरे केस कदाचित लपवता येऊ शकतील.

कॅफीनेटेड प्रोडक्ट्सचा वापर करू नका

केस पांढरे होण्याची सुरुवात झाल्यानंतर चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आदींचे सेवन कमी करा. त्याऐवजी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये एंटी ऑक्सिडेंटचे अधिक सेवन करा. याव्यतिरिक्त फोलिक एसिडने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करा. ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुमच्या डाएटमध्ये ग्रीन टी पिणे विसरू नका.

मेहंदी लावा

पांढर्‍या रंगाचे केस रंगवण्यासाठी मेहंदी वापरा. मेहंदी आपल्या केसांना नैसर्गिकरित्या ग्लो देण्याचे कार्य करते. नियमितपणे मेहंदी लावल्यामुळे आपले केस चमकदार बनू शकतात. आपण मेहंदीचा वापर एक नैसर्गिक कंडीशनर म्हणून करू शकतो.

ऑयल बेस्ड रंगाची निवड करा

जर तुमचे केस वेगाने पांढरे होत असतील, तर त्यांना लगेच रंग लावू नका. केस रंगवल्यामुळे त्यांचा नैसर्गिक रंग जातो. आपण केसांचा रंग निवडताना एक खबरदारी घ्यावी लागेल कि आपण वापरणार असलेला रंग ‘ऑयल बेस्ड कलर’ असावा. (Is the hair turning white, Then do the this solution quickly)

इतर बातम्या

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?

अनर्थ टळला ! धोबीघाट परिसरात टेकडीची माती खचल्यामुळे रिकामी केलेली 2 घरं कोसळली, जीवितहानी नाही

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.