केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क लावणे फायदेशीर!
हंगाम कोणताही असो केस कोरडे होण्याच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. केसांचा कोरडेपणा रोखण्यासाठी आपण काह घरगुती उपाय देखील करू शकतो.
मुंबई : हंगाम कोणताही असो केस कोरडे होण्याच्या समस्येमध्ये वाढ होत आहे. केसांचा कोरडेपणा रोखण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. जर आपण बाजारातून तयार हेअर मास्क विकत घेत असाल, तर केसांच्या गुणवत्तेनुसार खरेदी करा. या पेक्षा आपण घरच्या घरी हेअर मास्क तयार करा आणि आपल्या केसांना लावा. (It is beneficial to apply this hair mask to remove dryness of hair)
यासाठी 2 चमचे नारळ तेलात 3 चमचे, कोरफड जेल आणि 4 चमचे दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि अर्धा तास तशीच सोडा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. आपण आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. यामुळे आपल्या केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस याचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.
तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील. अळशीची पूड दोन चमचे, नारळाचे तेल चार चमचे, फुल क्रीम मिल्क एक कप, अंड्यातील पिवळे बलक एक, दही तीन चमचे सर्वात अगोदर आपण अळशीच्या बियांपासून जेल तयार करून घ्या.
एका पॅनमध्ये अळशीच्या बियांची पावडर घ्या. त्यामध्ये दूध आणि एक वाटी पाणी ओता. गॅसच्या मध्यम आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण शिजू द्या सामग्री घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि एका वाटीमध्ये मिश्रण गाळून घ्या. 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to apply this hair mask to remove dryness of hair)