Skin Care : गर्भधारणेनंतर त्वचेची काळजी घेणे महत्वाचे, जाणून घ्या खास टिप्स!
प्रसूतीनंतर काही स्त्रियांना त्वचेची पोत, पुरळ, डार्क सर्कल तसेच स्ट्रेच मार्क्स आणि पिग्मेंटेशनमध्ये बदल जाणवतात, त्यामुळे तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व प्रसुतीनंतर आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आहे.
मुंबई : प्रत्येक स्त्रीला आई बनण्याची इच्छा असते. आई होण्याची भावना अनोखी आहे. पण आई झाल्यावर अनेक गुंतागुंत होऊ लागतात. ज्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जन्म देणे हा एक जीवन बदलणारा अनुभव असला तरी, मातृत्व त्याच्या स्वतःच्या विचित्र दुविधा आणि गुंतागुंत घेऊन येते. स्त्रियांना अचानक केस गळणे आणि अतिसंवेदनशील त्वचा प्रसूतीनंतर अनुभवणे सामान्य गोष्ट आहे. (It is important to take care of the skin after pregnancy)
प्रसूतीनंतर काही स्त्रियांना त्वचेची पोत, पुरळ, डार्क सर्कल तसेच स्ट्रेच मार्क्स आणि पिग्मेंटेशनमध्ये बदल जाणवतात, त्यामुळे तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व प्रसुतीनंतर आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आहे. तुमच्या बाळाच्या जन्मानंतर लगेच, तुमच्या हार्मोनची पातळी झपाट्याने खाली येते आणि यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश होतो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ ठेवावी लागते. केमिकल-फ्री क्लींजर वापरणे तुमच्या त्वचेसाठी आवश्यक आहे. केवळ चांगले दिसण्यासाठीच नव्हे तर निरोगी वाटण्यासाठी देखील. क्लींजर त्वचेला लावले पाहिजे. आपली त्वचा मॉइश्चराइझ करण्यासाठी, आपल्याला नेहमी मॉइश्चरायझिंग क्रीमची आवश्यकता नसते. आपण काही घरगुती उपाय करूनही त्वचा मॉइश्चराइझ करू शकता.
त्वचा सुंदर आणि तजेलदार मिळवण्यासाठी आपण फेस मास्क देखील वापरू शकतो. पपई आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगली असते. हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. हे पचन सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. पण पपई चे फेस मास्क देखील त्वचा सुधारते. 6 ते 10 चौकोनी पपई, 2 टेबलस्पून दूध आणि एक चमचे मध घ्या. पपई मॅश करा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मग हे सर्व मिसळा. पेस्ट लावा आणि धुण्यापूर्वी 15 मिनिटे सोडा. हा फेस मास्क तुमचा चेहरा चमकदार आणि गुळगुळीत करेल कारण ते त्वचेला हायड्रेट करते आणि पोषण देते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is important to take care of the skin after pregnancy)