उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही लावा सनस्क्रीन, अन्यथा होईल ‘हा’ गंभीर आजार
सूर्याचे हानिकारक किरणे वर्षभर असतात. सूर्यातून उत्सर्जित होणारे अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या त्वचेला अनेक प्रकारे नुकसान करतात. यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्वचेच्या काळजीमध्ये सनस्क्रीनचा समावेश करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये प्रचलित आहे. त्यापैकी एक म्हणजे उन्हाळ्यात किंवा सूर्यप्रकाश असतानाच सनस्क्रीन लावणे आवश्यक असते. पण सनस्क्रीन पूर्ण वर्षभर लावणे आवश्यक असते.
या किरणांचे दोन मुख्य प्रकार आहेत
UVA किरण: हे किरण त्वचेच्या खोलवर पोहोचतात आणि कोलेजनचे नुकसान करतात. ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा चेहऱ्यावर येतात. हे किरण ढगांमधून आणि खिडकीच्या काचे मधून तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात.
UVB किरण: या किरणामुळे त्वचा जळते आणि टॅनिंग होऊ शकते. हे किरण त्वचेला आतून नुकसान करतात. ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
हिवाळ्यात सूर्याची तीव्रता: हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो. पण याचा अर्थ असा नाही की अतिनील किरण तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
हिवाळ्यात कोणते सनस्क्रीन वापरावे?
हिवाळ्यात हलके आणि नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रीन वापरावे. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन निवडू शकता. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल किंवा लोशन आधारित सनस्क्रीन वापरू शकतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्रीम आधारित सनस्क्रीनचा वापर करू शकता.
सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
बाहेर जाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. संपूर्ण चेहरा आणि शरीरावर समान रितीने सनस्क्रीन लावा. दोन तासानंतर सनस्क्रीन पुन्हा लावा. पोहल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर पुन्हा सनस्क्रीन लावा.
हिवाळ्यात सनस्क्रीन लावण्याचे फायदे
वृद्धत्व रोखते: अतिनील किरणांमुळे त्वचा वृद्ध होऊ शकते. सनस्क्रीन लावल्यामुळे तुम्ही त्वचेचे वृद्धत्व टाळू शकता आणि सुरकुत्या तसेच बारीक रेषा कमी करू शकतात.
सनबर्न पासून वाचवते: हिवाळ्यातही उन्हात जळजळ होण्याचा धोका असतो खास करून तुम्ही जास्त वेळ बाहेर फिरत असाल तर सनस्क्रीन लावून तुम्ही सनबर्न टाळू शकता.
त्वचेचा रंग एक सारखा करते: सनस्क्रीन लावल्याने त्वचेचा रंग एकसमान होतो आणि पिगमेंटेशनची समस्या कमी होते.
त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो: अतिनील किरण हे त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. सनस्क्रीन लावून तुम्ही त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)