Winter Care | थंडीच्या लाटेत शरीरात उष्मा कसा टिकवायचा? कपड्यांपासून खाण्या-पिण्यापर्यंतच्या टिप्स
आला हिवाळा, तब्येत सांभाळा असे आपण म्हणतो, या उपायांनी तुम्ही थंडी पळवून लावू शकता आणि थंडीच्या काळात कुटुंबियांना सुरक्षित ठेऊ शकता. राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन समितीने यासंबंधीचा अलर्ट दिला आहे.
मुंबई : आला हिवाळा तब्येत सांभाळा, असं आपण मुलांसह घरातील सदस्यांचं वाहतं नाकं पाहून सहज म्हणू शकतो. अचानक थंडीचा पारा घसरल्याने देशासह राज्याला हुडहुडी भरली आहे. कडाक्याच्या थंडीत स्वतः चे आणि कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना योजणे गरजेचे झाले आहे. हिवाळ्यातील गारठा आपल्याला आजारी पाडू शकतो. सर्दी पडसे खोकला छातीतील कफ, ताप ही दुखणी मान वर काढू शकतात. वृद्ध आणि मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते या आजारांना पटकन बळी पडू शकतात.
- जाड आणि उबदार कपड्यांवरच हिवाळ्यातील ही लढाई अवलंबून नाही तर त्यासाठी आणखी काही उपाय करावे लागतात.
- मुलांना भरपूर पाणी पिऊ द्या. पाणी पिल्याने शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा ही मिळेल आणि शरीरातील विष आणि घाण शरीराबाहेर पडेल.
- हिवाळ्यात बाहेर पडताना उबदार कपडे घाला. हात आणि पाय झाकतील अशी कपडे वापरा. पायात मोजे आणि हातात हातमोजे वापरा डोक्याला मफलर, कानटोपी, हॅट यांचा वापर करा. आवश्यक असेल तरच सकाळच्या गारठ्यात पुरेशा काळजी सह बाहेर पडा.
- सकाळी सकाळी अथवा संध्याकाळी नियमित व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील उष्णता कायम राहील. मुलांना खेळण्यासाठी मैदाने, क्रीडांगणावर न्यावे.
शरीरातील उष्मांक कायम ठेवा
बाहेरच्या गार वाऱ्यात टिकून राहण्यासाठी गरमागरम आहार घ्यावा. उष्मांक टिकवण्यासाठी फळं भाज्या याचा आहारात समावेश असावा. अंडी, मांस यांचाही वापर करता येईल.
घरात अशी घ्या काळजी
घराची दारे खिडक्या लावलेल्या असू द्या. घरात थंड हवा येणार नाही याची काळजी घ्या. हिटर असेल तर त्याची परिणामकारकता तपासा. घरातील पडदे दारे खिडक्यांवर ओढून घ्या. टाईल्स वर थंडपणा अधिक जाणवतो. त्यामुळे चटई टाका. दुपारच्या उन्हात गच्चीवर अंगणात बसून ऊनाची उब मिळविता येईल.
विशेष बाब म्हणजे हिवाळ्यात अल्कोहोल पिऊ नका. त्यामुळे बळ मिळण्याऐवजी शरीराचे नुकसान अधिक होईल. योग्य वेळी आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घ्या. तुम्ही पिण्याचे पाणी गरम करून पिऊ शकता
संबंधित बातम्या :
प्रसुतीनंतर ताप येतोय, घाबरण्यांचं कारण नाही! जाणून घ्या काय आहेत कारणं…
‘सुस्ती’ला द्या सुट्टी: म्युझिक ते स्ट्रेचिंग; कामाच्या वेळी आळस घालविण्याचे सर्वोत्तम पर्याय
Drinking water : पाणी प्यायची योग्य वेळ आणि योग्य पद्धत…आणि राहा निरोगी