Hair Care : कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करा!
डोक्यातील कोंडा ही एक अशी समस्या आहे की एकदा झाली की ती सहजासहजी दूर होत नाही. मात्र, कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने बाजारामध्ये मिळतात. पण तरीही डोक्यातील कोंड्याची समस्या काही दूर होत नाही.
मुंबई : डोक्यातील कोंडा ही एक अशी समस्या आहे की एकदा झाली की ती सहजासहजी दूर होत नाही. मात्र, कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने बाजारामध्ये मिळतात. पण तरीही डोक्यातील कोंड्याची समस्या काही दूर होत नाही. काही दिवसांनी ही समस्या वाढते. कोंड्यामुळे खाज सुटण्याची समस्या वाढते. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (Know how these home remedies to get rid off dandruff)
खोबरेल तेल
खोबरेल तेलात नैसर्गिकरित्या हायड्रेटिंग गुणधर्म असतात. जे टाळूवर बुरशीचा प्रसार रोखतात. यासाठी तुम्हाला ते थेट तुमच्या टाळूवर लावावे लागेल. काही काळ तेलाने मालिश करा आणि जेणेकरून ते केसांच्या टाळूमध्ये खोलवर जाईल. काही वेळानंतर केस धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तुमच्या टाळूमधून जास्तीचे तेल काढून टाकण्यास मदत करते. जेणेकरून टाळू ओलसर राहील. एक चमचा बेकिंग सोडा हर्बल शैम्पूमध्ये मिसळून कोंड्यापासून मुक्तता मिळवा. हे मिश्रण टाळूवर लावा आणि नंतर पाण्याने धुवा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.
कोरफड
कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात. हे तुमच्या टाळूला मॉइस्चराइज करण्यास मदत करते. त्यासाठी तुम्हाला टाळूवर कोरफड जेल लावावे लागेल आणि नंतर सौम्य शॅम्पूने ते धुवावे लागेल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करा.
कडुलिंब
कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. प्राचीन काळापासून याचा वापर केला जात आहे. डेंडरफ अँटी शैम्पूमध्ये कडुलिंबाचा मुख्य घटक म्हणून वापर केला जात आहे. याशिवाय कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने कोंडा दूर होतो. याशिवाय कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून केसांवर लावा आणि सुमारे 10 ते 15 मिनिटांनी पाण्याने धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म आहेत. जे बुरशीजन्य संसर्ग वाढण्यास प्रतिबंध करतात. यासाठी, आपण अॅपल सायडर आणि पाणी समान प्रमाणात मिसळावे आणि ते टाळूवर लावावे आणि सुमारे 30 मिनिटांनी सौम्य शैम्पूने धुवावे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Know how these home remedies to get rid off dandruff)